पुणे : अक्षय फाटक
नव्या पोलिस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर लागलीच पुणेकरांना सुरक्षितता देण्याचा आणि वाढता स्ट्रीट क्राईम रोखण्यासोबत अवैध धंद्यांना लगाम घालण्याचा निर्धार केला. त्यानुसार पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच बेकायदा चालणारे धंदे आढळल्यात तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही शहरवासियांना केले. चांगल्या कल्पनांना उचलून धरणारे, भरभरून प्रतिसाद देणार्या पुणेकरांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या धंद्याची माहिती तेवढ्याच तत्परतेने देणे सुरू केले.पंधरा दिवसांत 95 तक्रारी आल्या. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना दिसणारे हे अवैध प्रकार पोलिसांच्या लेखी बहुतांश ठिकाणी आढळून आलेले नाहीत. कारण, पोलिस घटनास्थळी जाऊन आले. मात्र म्हणे, त्यांना या ठिकाणी अवैध असे काही सापडले नाही!
No comments:
Post a Comment