Wednesday, August 22, 2018

पोटभाडेकरू ठेवणाऱ्यांवर कारवाई

महापालिकेचा पथारी परवाना घेऊन हा परवाना भाडेकराराने देणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे; तसेच ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असे प्रकार उघडकीस येतील तेथे संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन अतिक्रमण विभागाने केले आहे. या आठवड्यापासून ही कार्यवाही सुरू केली जाणार आहे. पालिकेने दिलेल्या एकूण परवान्यांपैकी ६० टक्के परवाने भाडेकराराने दिल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment