विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पदव्या वाटणाऱ्या पुरंदर विद्यापीठाप्रमाणेच 'इन्स्टिट्यूट ऑफ बिहेव्हियरल अँड मॅनेजमेंट सायन्स' (आयएमबीएस) शैक्षणिक संस्था विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक करत असल्याचा आरोप डॉ. अभिषेक हरिदास आणि विकास कुचेकर यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी केला. राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांच्याकडे कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार करण्यात आल्याचे डॉ. हरिदास यांनी सांगितले आहे. दरम्यान, या पदव्या घेण्यात देशातील कुलगुरू आणि अध्यात्मिक गुरू आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
No comments:
Post a Comment