वारजे उपनगरातील वारजे, कर्वेनगर मुख्य चौक, तसेच आंबेडकर चौक, वारजे हायवे चौक, माळवाडी बसस्टॉप, गणपती माथा, तसेच शिवणे या मुख्य चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्सला उधाण आले असून या अनधिकृत बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसर विद्रुप झाल्याचे दिसून येत आहे. परिसर विद्रुपीकरणासह पालिकेची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणार्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक करत आहेत. महापालिका हद्दीत फ्लेक्स लावण्यासाठी आकाश चिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही कुठलीही परवानगी न घेता अनेकदा असे जाहिरात फ्लेक्स लावले जात आहेत.
No comments:
Post a Comment