शहरातील पेठांमधून मेट्रोचा मार्ग भुयारी असणार आहे. या मार्गामुळे या भागातील अनेक घरे बाधीत होत आहेत. त्यामुळे याठिकाणी उन्नत मेट्रो करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र पेठांमधील रस्ते अरुंद असल्यामुळे ते शक्य नाही. याशिवाय उन्नत आणि भुयारी मेट्रोविषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे आढळून येत आहे. हे गैरसमज दूर करून शहरातून भुयारी मेट्रो मार्ग कसा करण्यात येणार आहे याविषयी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी नागरिकांसाठी आयोजित संवादात माहिती दिली.


No comments:
Post a Comment