पुणे- केरळमध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे महापुराचा फटका लाखो नागरिकांना बसला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मध्य रेल्वेने विशेष रेल्वे मालगाडीच्या 14 वॅगनमधून सात लाख लिटर पाणी केरळातील तिरुअनंतपुरमकडे रवाना केले. दरम्यान, लोणावळ्यातून चार वॅगन आणि रतलामहून पाण्याने भरलेली 15 वॅगनची मालगाडी या गाडीला जोडल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
No comments:
Post a Comment