Friday, August 24, 2018

विद्यापीठात भाषा उद्यान

जगभरातील सहा हजारांहून अधिक भाषा झाडांच्या माध्यमातून बोलत्या करण्याची किमया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साधली जाणार असून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या आवारात असणाऱ्या मोकळ्या जागेत जागतिक भाषा उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हवी ती भाषा ऐकता येणार आहेत. या उद्यानाच्या कामाला सुरुवात २८ सप्टेंबरपासून होणार असून, पुढच्या वर्षी ३० जानेवारीला ते प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे.

No comments:

Post a Comment