Saturday, June 30, 2018

टेमघर धरणात पाणी साठण्यास सुरवात

खडकवासला : टेमघर धरणाची दुरूस्ती करण्यासाठी धरण मागील वर्षी जानेवारी 2017 मध्ये पूर्ण रिकामे करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळी वर्षात या धरणात आज 0.10 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा होण्यास सुरवात झाली आहे. 

टाटांच्या धरणातील पाणी सिंचनासाठी वापरणार

'पीएमआरडीए' आयुक्त किरण गित्ते यांची माहिती

'मुंबईसारख्या शहराची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी अनेक नवे स्रोत निर्माण झाले असल्याने टाटाच्या पाचही धरणांतील पाण्याचा वापर भविष्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी करावा लागेल,' अशी शक्यता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी शुक्रवारी वर्तवली. गित्ते यांच्या वक्तव्यामुळे भविष्यकालीन नियोजनामध्ये टाटाच्या धरणांतील पाणी पिण्यासह शेतीसाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीने सरकारकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

घोरपडी पुलावरील अतिक्रमणे हटविणार

घोरपडी येथील सोलापूर रेल्वे लाइनवर उभारण्यात येणाऱ्या नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरणारी १६ अतिक्रमणे पुढील १५ दिवसांत तातडीने हटविण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिकेतील बैठकीत घेण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री आणि स्थानिक आमदार दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पालिकेत बैठक झाली. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव, महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला, स्थानिक नगरसेविका मंगला मंत्री, लष्कर, रेल्वे प्रशासनाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

वारजे माळवाडी परिसरात सतत वीज पुरवठा खंडीत

वारजे माळवाडी : परीसरातील वाढीव वीज बील येत असून त्याचबरोबर वीज पुरवठा देखील वारंवार खंडीत होण्याची समस्या वाढली आहे. यामुळे, नागरिक त्रस्त  झाले आहेत. म्हणून महावितरणच्या विरोधात वारजे विकास कृती समिती धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे इशारा दिला आहे. याबाबत, कृती समितीच्या वतीने महावितरणला पत्र देण्यात आले. 

#MonsoonSession शिक्षण समिती कागदावर शाळा वाऱ्यावर

पुणे- खासगी, विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आव्हान असतानाही महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर आता दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरीही शिक्षण समितीच्या सदस्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे तब्बल लाखभर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य प्रशासनाच्या बेभरवशाच्या कारभारावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

शहरात 'तकरीर' मुशायराचे आयोजन

पुणे - हिंदी आणि उर्दू कविता, नज्म, गझल, गीत यांचा सुरेख संगम साधलेला एक आगळा वेगळा कार्यक्रम मुशायरा लवकरच शहरात रंगणार आहे. शहरातील काही नव्या दमाचे कवी पत्रकार भवन, नवी पेठ येथे उद्या 30 जून ला हा कार्यक्रम सादर करणार आहेत. 

मार्केटयार्डातील प्रस्तावित रस्ता रद्द करावा – दि पूना मर्चंट्‌स चेंबरची मागणी

पुणे- मार्केटयार्डात डीपी रस्ता प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. हा रस्ता रद्द करावा, अशी मागणी दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केली आहे. हा रस्ता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Posers on door-to-door survey officials' diligence

Pune: The state election officials covered just about 40% houses in Maharashtra in the door-to-door survey of voters, while the figures for the Pune district stood at 30%.

RTO begins drive to check school vehicles in Pune

PUNE: A majority of the 59 school transport vehicles against whom the Pune regional transport office (RTO) took action on Friday did not hold proper permits required to ferry students, the RTO authorities stated.

MahaMetro starts survey of properties located on 2 routes

PUNE: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) on Friday said it has initiated a baseline survey of properties, including homes, slums and shops, which will be demolished since they fall on Metro route.

Financial closure of Pune Metro nears completion

PUNE: The Department of Economic Affairs (DEA) has posed Pune Metro Rail Project to funding agencies European Investment Bank (EIB) to the tune of 600 million euros and AFD for the balance 245 million euros.

‘व्हीएमडी’ची कामे थांबवा

महापालिका आयुक्तांचे 'स्मार्ट सिटी' कंपनीला आदेश

स्मार्ट सिटी कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या 'व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले'ची (व्हीएमडी) कामे तत्काळ थांबविण्याचे आदेश महाालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने 'व्हीएमडी' उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी. यापूर्वी उभारण्यात आलेले 'व्हीएमडी' पालिकेच्या जाहिरात आणि फलक नियंत्रण निमयमावलीनुसार नसल्यास ते काढून टाकावेत अन्यथा पालिकेकडून ते काढून टाकण्यात येईल, अशी तंबीही आयुक्तांनी स्मार्ट सिटी कंपनीला दिली.

खासगी बसचा प्रस्ताव बासनात

'पीएमपी'ने ठरवून दिलेल्या मार्गांवरच सेवा देण्याची भूमिका

सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षांनी धरलेला खासगी कंपनीच्या प्रस्तावाचा आग्रह शुक्रवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पूर्णत: फेटाळून लावला. खासगी कंपनी इच्छुक असलेल्या मार्गावर नाही, तर पीएमपीने ठरवून दिलेल्या मार्गावरच बससेवा चालविता येऊ शकेल असे स्पष्ट करताना त्याचा सविस्तर प्रस्ताव पालिकेला नाही, तर पीएमपीला सादर करावा, अशी ठाम भूमिका पीएमपीने घेतली. त्यामुळे, भाजप शहराध्यक्षांनी पुढाकार घेतलेला हा प्रस्ताव आता मागे पडण्याची चिन्हे आहेत.

जनसुनावणीत २६ हजार निवेदने

'मराठा आरक्षणाबाबत घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये सुमारे २६ हजार निवेदने सादर करण्यात आली आहेत. यामध्ये सामाजिक संस्था, संघटना, ग्रामपंचायती आणि वैयक्तिक निवेदने आहेत,' असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांनी सांगितले.

नियमबाह्य शाळाबसवर बडगा

शाळा आणि पालकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन

‘व्हेजमार्ट’मधून सेंद्रिय मालाला डिजिटल बाजारपेठ

प्रश्‍न - ‘व्हेजमार्ट’ स्टार्टअपची संकल्पना कशी सुचली? याची वैशिष्ट्ये काय?
अशोक पाटील - मला काही वर्षांपूर्वी घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. शरीरावर घातक परिणाम करणारी रासायनिक खते, कीटकनाशके कर्करोगाला कारणीभूत असल्याचे समजले. त्यानंतर औषधोपचाराने मी कर्करोगावर मात केली. मात्र शेणखत, कंपोस्ट खतांवर शेती करण्यात यापुढील आयुष्य घालवायचे, असे ठरविले. त्यानंतर २०१५मध्ये ‘व्हेजमार्ट’ हे संकेतस्थळ आणि ॲपच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील सेंद्रिय शेती करणाऱ्या पाचशे शेतकऱ्यांना एकत्र करून पालेभाज्या, फळभाज्या, मसाले, दूध आदींच्या विक्रीसाठी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध केली. एक किलो ते पाचशे किलोपर्यंतचा शेतातील माल थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोचविणे हे आमचे वैशिष्ट्य आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडे

पुणे - डीएसके कर्ज प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे हे अडचणीत आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर बँकनेही त्यांचा पदभार काढून घेतला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचेही सर्व अधिकार बँकेने काढून घेतले आहेत.  

Friday, June 29, 2018

जुलैअखेर शहरात इलेक्‍ट्रिक बसची ट्रायल

– स्वारगेट ते पुणे स्टेशन मार्ग निश्‍चित : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मिळणार निधी

पुणे – प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत पुढील वर्षभरात शहरातील वाहतूक व्यवस्थेत इलेक्‍ट्रिक बस (ई-बस) सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी भाडेतत्वावर पाचशे ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत. शहरात प्रथमच ई-बस सेवा सुरू करण्यात येत असून त्याबद्दलची कुठलीही तांत्रिक माहिती प्रशासनाला नाही. यासाठी ट्रायल बेसीसवर शहरात एक इलेक्‍ट्रिक बस धावणार आहे. जेबीएम या कंपनीची ही इलेक्‍ट्रिक बस असून यासाठी स्वारगेट ते पुणे स्टेशन दरम्यानचा मार्ग निश्‍चित करण्यात आला असल्याची माहिती पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी दिली.

सीएनजी बस खरेदी प्रक्रिया लवकर राबवा - मुख्यमंत्री

पुणे - आगामी काळात डिझेलच्या बस घेऊ नये, सीएनजी आणि इलेक्‍ट्रिक बस खरेदीची प्रक्रिया लवकर राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रलंबित प्रकल्प लवकर मार्गी लावण्याबाबतही त्यांनी संबंधितांना सांगितले. 

पस्तीस वर्षांनंतर गांधीनगर रिकामे

औंध - पुणे-मुंबई मार्गावरील बोपोडीच्या गांधीनगर परिसरात गेली पस्तीस वर्षे असलेली वस्ती आज पूर्णपणे हटविण्यात आली. पुणे-मुंबई मार्गावर बोपोडीत उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी येथील झोपड्या हटविण्यात आल्या. पस्तीस वर्षे जपलेले ऋणानुबंध तुटल्याचे भाव येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते; तसेच भावनिक संबंध जुळलेले शेजारी दुरावणार असल्याचे दुःखही दिसत होते. 

महापालिकेत समाविष्ट 11 गावांसाठी विशेष निधी

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या प्रकल्पाग्रस्तांचा प्रश्‍न सोडविण्यासाठीही प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

#MonsoonSession प्रलंबित प्रश्‍नांसाठी सर्वपक्षीय आमदारांची वज्रमूठ

पुणे - वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला. पक्षभेद विसरून प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य देण्याचाही निर्धार या वेळी झाला. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी "एसआरए'च्या नियमावलीतील त्रुटी दूर करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करतानाच शेतीसाठीही पुरेसे पाणी देण्यात येईल, तसेच पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी केली. 

#MonsoonSession अनुपस्थित आमदार आणि त्यांची कारणे

पुणे जिल्ह्याची लोकसंख्या तब्बल एक कोटीवर पोचली आहे. राजकीय भाषणांचे फड गाजवितानाच या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या प्रमुख प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात आवाज उठवावा आणि प्रश्न सोडवावेत, इतकीच सर्वसाधारण मतदाराची अपेक्षा असते. या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधींनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरी प्रश्नांवरील चर्चेत सहभागी न होण्याची नेमकी कोणती कारणे समोर केली याचा सारांश 

Parking, driving on footpaths attract steep fines from police

Areas that were majorly affected are University Road, Karve Road, Swargate, Jangali Maharaj Road and Aundh. Karve Road was found most affected ...

PMC to take action against PSCDCL over e-advertising boards

The issue was raised by Congress corporator Avinash Bagawe, who sought clarification from the civic administration on the digital advertising boards in the city.

5 ward areas account for 50% of Pune’s dengue

PUNE: Dengue virus, .initially prevalent in the fringe areas, has fast spread its tentacles in the city with PMC’s five ward offices, including Hadapsar-Mundhwa, accounting for 50% of the city’s disease burden.

पुणे: पालिका मुख्यसभेत वर्गीकरणांचा पाऊस

71 प्रस्तावांच्या 19 कोटींना मान्यता
पुणे – महापालिकेच्या अंदाजपत्रकातील कामे “डीएसआर’ अर्थात विभागनिहाय दरपत्रक अंतिम झाल्याने ती नुकतीच निविदा प्रक्रियेत आहेत. त्यात आता नगरसेवकांच्या “स’ यादीतील तब्बल 19 कोटी रुपये अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामे वगळून इतर कामांसाठी वळविण्यास महापालिकेच्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे यंदाही महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या मोडतोडीची परंपरा कायम असल्याचे समोर आले आहे.

पीएमपीएलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसद्वारे प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणाहून बसेसने प्रवास करणार्‍या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री-अपरात्री महिलांना प्रवास करताना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापार्श्‍वभुमीवर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पीएमपी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आमदार निलम गोर्‍हे यांनी 10 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पीएमपीएल महामंडळाच्या कार्यालयात मंगळवारी दि 26 महिलांसाठी सुसंवाद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, विधी अधिकारी नीता भरमकर, स्त्री आधार केंद्रचे रमेश शेलार  उपस्थित होते.

दीड लाख ठिकाणी डासांची उत्पत्ती


तात्पुरत्या उत्पत्तीस्थानांची संख्या सर्वाधिक; आरोग्य विभागापुढे आव्हान

पावसाळा सुरू झाला असला तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या डासांची उत्पत्तीस्थानांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे दीड लाखांहून अधिक ठिकाणी शहरातील भागांमध्ये डेंगीची उत्पत्तीस्थाने असल्याने त्यांना नष्ट कऱण्याचे आरोग्य खात्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. उत्पत्तीस्थाने वाढलेल्या ठिकाणांमध्ये तात्पुरत्या उत्पत्तीस्थानांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे.

पालिकेची आमदारांवर ‘कृपा’

प्रति चौरस फूट १४ पैशांनी जागा दिल्याचा विरोधकांचा आरोप

शहरातील रस्यावरील पथारी व्यावसायिकांकडून पालिका प्रशासन दिवसाला शंभर रुपये शुल्क वसूल करीत असताना दुसरीकडे हडपसरमधील आमदारांवर कृपादृष्टी दाखवून प्रशासनाने त्यांना १४ पैसे प्रति चौरसफूट दराने जागा दिल्याचा आरोप गुरुवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आला. प्रशासनाच्या या चुकीच्या कारभारावर टीकेची झोड उठवून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तात्पुरत्या स्वरुपात ही जागा देण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाने केला. मात्र, कोणत्या नियमाने ही जागा देण्यात आली, याचा खुलासा अधिकाऱ्यांना करता आला नाही.

एलईडी प्रकल्पाची चौकशी

महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि देशभरात विविध पुरस्कारांनी नावाजलेल्या 'एलईडी' प्रकल्पांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामधून नेमकी किती वीज बचत होते, याच्या तपासणीसाठी 'कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग' (सीईओपी) या संस्थेकडून या योजनेचे संपूर्ण 'ऑडिट' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय या प्रकल्पाच्या निविदा, ठेकेदार कंपनीला देण्यात आलेले कार्यादेश, कंपनीला अदा करण्यात येत असलेली रक्कम याचेही महापालिकेकडून 'ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला आहे.

खाद्यपदार्थाचे दर कमी करा; अन्यथा खळ्ळ खटय़ाक!

मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘मल्टिप्लेक्स’ना इशारा

घरपोच आधार सेवेचे अर्ज शंभर टक्के निकाली

आवश्यक कागदपत्रांअभावी पाच अर्ज प्रलंबित

नव्या इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटलाही घाईच

पालिकेला सात दिवसांत हवे ऑडीट
पुणे  : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या घाईमुळे घाई गडबडीने काम उरकणाऱ्या पालिका प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटचीही घाई झाल्याचे समोर आले आहे. या नवीन विस्तारीत इमारतीचे कॉम्प्रेहेन्सीव स्ट्रक्‍चर ऑडीट सात दिवसात करून द्यावे असे पत्र महापालिका प्रशासनाने गुरूवारी तातडीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला दिले आहे. त्यामुळे सात दिवसात हे ऑडीट योग्य पध्दतीने होणार की संबधिताना क्‍लीन चीट देण्यासाठी ही गडबड केली जात आहे असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेअ. दरम्यान, या पत्रात, उद्घाटनाच्या दिवशी इमारतीमध्ये एका नव्हे तर दोन ठिकाणी पाणी गळती झाल्याचे नमूद केले असल्याने दुसरी गळती नेमकी कोठी झाली याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पीएमआरडीएची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील सर्वे नंबर 104/19 मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून 4 हजार 500 चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त केले. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966च्या कलम 53 (1) अन्वये संबधिताना प्रत्येकी दोनदा नोटीसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती.

पुणे : 'प्रकाश भवन'मध्ये वीजग्राहकांनाच नो एन्‍ट्री!


[Video] पुणे पालिकेच्या नव्या इमारतीच्या गळतीचे पडसाद मुख्यसभेत


Thursday, June 28, 2018

[Video] म्हणून तर यांना पुणेकर म्हणतात ना भाऊ! आता काय केलेय पुणेकरांनी


Metro work along river to stop during dam water release

PUNE: The Metro work along the Mutha river might stop for almost a month from mid-July, when the irrigation department would release dam water into the river.

खंडपीठाची प्रतीक्षा कायम!

पुणे - ‘उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे’, यासाठी गेल्या २५ वर्षांपासून शहरातील वकील पाठपुरावा करत आहेत; पण अजूनही त्याला यश आलेले नाही. या संदर्भात वेळोवेळी आंदोलने झाली, मागण्यांची निवेदने सादर करण्यात आली; पण कशाचाही उपयोग झालेला नाही. ‘या प्रयत्नांना अपेक्षित राजकीय साथ मिळालेली नाही’, 

#PuneSafety पहाटे वाढविणार पोलिसांची गस्त

पुणे - सोनसाखळी चोरीबरोबरच चोरट्यांकडून पहाटे प्रवाशांची होणारी लूटमार थांबविण्यासाठी पहाटेच्यावेळी पोलिसांची गस्त वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली.

#MonsoonSession "स्मार्ट सिटी'ला गरज दे धक्‍याची !

पुणे - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी "स्मार्ट सिटी' प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्‌घाटन पुण्यात झाले; पण येथील प्रकल्पांना वेग येण्यासाठी महापालिकेच्या "दे धक्‍क्‍याची'ची गरज आहे. केंद्र सरकारने "स्मार्ट पुणे' करण्यासाठी 386 कोटी रुपये दिले; तरीही दोन वर्षांत फक्त 76 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पुढील वर्षात तब्बल 2,300 कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

#MonsoonSession वाडेही कोलमडले..!

पुणे - महापालिका प्रशासनाकडून पाच वर्षांपूर्वी झालेली ‘प्रिंटिंग मिस्टेक’ राज्य सरकारनेही दुरुस्त न केल्याने शहराच्या जुन्या हद्दीतील वाडे, सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. ‘ही चूक दुरुस्त कधी होणार’, याची मध्यवस्तीतील नागरिक वाट पाहत आहेत. शहरात ३० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या इमारतींची संख्या जवळपास ३० टक्के आहे. पुणे महापालिकेच्या नव्या नियमावलीस मान्यता देताना राज्य सरकारने ‘ड’ वर्ग महापालिकेचे नियम ‘ब’ वर्ग महापालिकेला लागू केल्यामुळे हा सर्व गोंधळ झाला असल्याचे बोलले जात आहे. ‘प्रिंटिंग मिस्टेक’ कायम राहिल्याने शहराच्या जुन्या हद्दीतील रहिवाशांच्या हाती फक्त धुपाटणे राहिले. 

वारजे पुण्याची प्रतिकृती

पुण्याच्या पश्चिमेची वाढ विचारात घेता स्वातंत्र्यपूर्व काळात नदीच्या अलीकडेच शहर मर्यादित होते.

नाविण्यपूर्ण आणि यशस्वी प्रकल्पांसाठी पुणे शहराची निवड

पुणे-गृहनिर्माण आणि शहरी प्रकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत भारत स्मार्ट शहर पुरस्कार २०१८ अंतर्गत सर्वात नाविण्यपूर्ण आणि यशस्वी प्रकल्पांसाठी पुणे शहराची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महानगर पालिका माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी दिली.

कामे कमी, पुरस्कार उदंड!

‘स्मार्ट सिटी’च्या कामांची विसंगती; कागदोपत्रीच चकाचक

‘पालिकेच्या शेजारचा रस्ता एकेरी करा’

महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील पीएमपीचे बसस्टॉप या भागात असलेल्या टपळे गॅरेजच्या जागेत हलवून तेथून बस सुटण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत झाली असली, तरी या रस्त्यावरून बस चालविताना अनेक अडचणी येतात. हा रस्ता दुहेरी असल्याने सतत येथे वाहनांची वर्दळ असते. तसेच या परिसरात होत असलेल्या पार्किंगमुळे वाहनांसाठी रस्ता कमी पडतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता 'एकेरी' (वन वे) करावा, असे पत्र पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पालिकेला दिले आहे. हा रस्ता एकेरी करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून अभिप्राय मागविण्यात आला असून त्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

भटक्या कुत्र्यांसाठी लसीकरणाची मोहीम

प्रभागनिहाय नियोजनावर पालिकेचा भर

शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने कुत्र्यांची नसबंदी करून 'अँटी रेबीज लसीकरणा'ची मोहीम हाती घेतली आहे. प्रभागनिहाय पद्धतीने मोहीम हाती घेण्यात आली असून, तीन महिन्यांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. पकडलेल्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी केंद्राची क्षमता वाढविण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Aundh ITI first in the country to roll out short courses in robotics, mechatronics

In a first in the country, the Industrial Training Institute (ITI), Pune, is set to rollout short-term courses in robotics and mechatronics starting this academic year. Along with regular students, the two courses will also be open for former ITI students who can make use of this platform to enhance their skills.

Aundh ITI first in the country to roll out short courses in robotics, mechatronicsAundh ITI first in the country to roll out short courses in robotics, mechatronicsAundh ITI first in the country to roll out short courses in robotics, mechatronics

As it waits for ministry funds sanctioned a decade ago, estimated cost of new C-DAC building almost doubles

A decade on, the Ministry of Electronics and Information Technology is yet to disburse over 30 per cent of the sum sanctioned for the construction of an Innovation Park for the Pune-based Centre for Development of Advanced Computing (C-DAC).

As it waits for ministry funds sanctioned a decade ago, estimated cost of new C-DAC building almost doubles

Chain restaurant outlets & malls fined for violating ban

PUNE: The Pune Municipal Corporation has penalised the outlets of major restaurant chains Domino’s and McDonald’s in the Shivajinagar area for violating the ban on plastic products in the past three days. Similar raids will continue with the focus on FC Road and JM Road.

किराणा वस्तूंच्या किरकोळ पॅकिंगवरील प्लास्टिक बंदी उठवली; पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची घोषणा

मुंबई (Pclive7.com):- किराणा दुकानातील पॅकेजिंगवरची बंदी उद्यापासून उठवण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. या निर्णयामुळे किरकोळ दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मसाला, साखर, तांदूळ, तेल आदी वस्तूंच्या विक्रीसाठी किरकोळ पॅकेजिंगवरची बंदी उठवण्यात आली आहे.

पाने बांधण्यासाठी तेंदुपत्ता, बटर पेपरचा वापर

प्लास्टिकबंदीवर पानविक्रेत्यांचा नामी उपाय

प्लास्टिक चमच्यांना पर्यावरणपूरक चमच्यांचा पर्याय

स्पर्धेतील संशोधनाचे आता उद्योगात रुपांतर 

प्लास्टिकबंदीमुळे महिलांच्या रोजगारसंधीत वाढ

कागद आणि कापडी पिशव्यांना मोठी मागणी

कागदी पिशव्या खाताहेत ‘भाव’

पुणे - आपल्या हातातील कॅरी बॅगची जागा आता कागदी आणि कापडी पिशव्यांनी घेतली आहे. त्यामुळे कापडी पिशवी पाठोपाठच कागदी पिशव्यांनी आता ‘भाव’ खाल्ला आहे. 

रेल्वे स्थानकावर प्लॅस्टिकबंदीचा फज्जा !

पुणे - राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असली, तरी पुणे रेल्वे स्थानकावर मात्र प्लॅस्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. प्रवाशांबरोबरच फेरीवाले, हॉटेल व्यावसायिकही प्लॅस्टिकचा वापर उदंडपणे करीत आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, कारवाई तर कोसो दूर असल्याचे "सकाळ'च्या पाहणीत बुधवारी दिसून आले. 

Drive to ensure maximum online enrolment of voters

PUNE: Nearly 12 residents associations across the city who had sought special voter enrolment camps on their premises have been directed to get registered during the special drive on July 14.

नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75% रक्‍कम काढण्याची सुविधा

नवी दिल्ली – नोकरी सुटल्यावर 30 दिवसांनी पीएफमधील 75टक्‍के रक्‍कम काढण्याची सुविधा देण्याचा निर्णय सेवानिवृत्ती निधी संस्थेने (ईपीएफओ) जाहीर केला आहे. आपल्या प्रॉव्हिडंट फंडातील 75 टक्के रक्कम काढून घेतल्यानंतर उर्वरित 25 टक्के रकमेसह आपले प्रॉव्हिडंट फंड खाते चालू ठेवण्याची सवलतही खातेदाराला देण्यात आलेली आहे.

प्राध्यापकांना कमी करता येणार नाही

'एआयसीटीई'ची इंजिनीअरिंग कॉलेजांना ताकीद

इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कॉलेज प्रशासनाने प्राध्यापक-विद्यार्थी प्रमाणात बदल झाल्याचे कारण पुढे करून प्राध्यापकांना कामावरून कमी करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही, अशी सक्त ताकीद 'अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे'ने (एआयसीटीई) पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे प्रामुख्याने इंजिनीअरिंग कॉलेजांसोबत व्यावसायिक कॉलेजांमधील प्राध्यापकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

लोणावळा लोकलच्या वेळापत्रकात बदल

गेल्या एक महिन्यापासून विविध कामांमुळे बंद असलेल्या पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारच्या वेळेतील लोकल सुरू होण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड मार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम एक ते २७ जुलै या कालावधीत सुरू केले जाणार असून, दुपारच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात या कालावधीत बदल करण्यात आला आहे.

हॅकेथोन स्पर्धेत जेएसपीएम प्रथम

मांजरी - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथोन राष्ट्रीय स्पर्धेत हडपसर येथील जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. बक्षीस स्वरूपात एक लाख रूपयाचा धनादेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी "स्मार्ट डोमेस्टीक गॅस ट्रॉली' हा प्रकल्प स्पर्धेत सादर केला होता. स्पर्धेमध्ये देशभरातून 7 हजार 500 प्रकल्प सहभागी झाले होते.

सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी तिसऱ्या स्थानी

चौफेर न्यूज – देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठीने तेलुगू भाषेला मागे टाकले असून या यादीत मराठी भाषा आता तिसऱ्या स्थानी पोहोचली आहे. हिंदी भाषा पहिल्या स्थानी असून हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्क्यांवरुन ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर बंगाली भाषा ही दुसऱ्या स्थानी आहे.

Wednesday, June 27, 2018

पुणे स्मार्ट सिटीच्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेत २०० सायकली दाखल

पुणे : स्मार्ट पुणेकर नागरिकांकडून मिळणा-या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने  राबविण्यात येत असलेल्या पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवेच्या सहाव्या टप्प्याचे उद्घाटन बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे काढता येणार पासपोर्ट

चौफेर न्यूज – पासपोर्ट बनवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. पासपोर्टसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता घरबसल्या मोबाइल अॅपद्वारे देशाच्या कोणत्याही ठिकाणाहून पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासपोर्ट घरपोच येईल. यासाठी पासपोर्ट सेवा अॅप लॉन्च करण्यात आलं आहे. डिजीटल इंडिया मोहिमेअंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पासपोर्ट सेवा दिवसाच्या निमित्ताने ही घोषणा केली.

Pune forest department bans entry to Tamhini, Andharban, Sudhagarh

To protect the biodiversity and ecosystem of the Western ghats, the forest department has taken strict measures by imposing a ban on entering eco-sensitive parts of Sudhagarh and Andharban in Mulshi area and the Tamhini ghat.

Tamhini Wildlife Sanctuary was listed under the state forest department’s protected areas category in 2013.

Maharashtra government directs implementation of measures for old arch bridges

The Maharashtra government has also ordered installation of proper lights on bridge with blinkers on sides, cat eye on passage to ensure there is no repeat of the accident like the one on the Savitri river on the Mumbai-Goa highway.

Shoppers quick to switch over to paper pouches

Sunday shoppers in Kalyaninagar were seen packing vegetables in brown paper pouches stacked at the supermarkets. The switch-over from plastic ...

Foodies bring own boxes for takeouts from restaurants

We are packing dry items in aluminium foils or paper boxes,” said Ramesh Pol, who handles a Vimannagar restaurant's phone calls. Pav bhaji centres ...

Pune: Soon, vehicle to recycle plastic waste at source

Heaps of garbage — particularly polythene bags, bottles and wrappers — lying along the roads have been a common site for people driving in or out of Pune, leaving a shabby impression about Maharashtra’s second largest city.

Maharashtra plastic ban: Traders protest outside PMC against ‘illegal’ crackdown


बंदीनंतर संकलित प्लास्टिकचे करायचे काय?

प्रक्रिया केली जाणार असल्याचा प्रशासनाचा दावा

पुण्यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या डब्यांना ‘अच्छे दीन’!

टेक अवे काऊण्टवर येणारी ऑर्डर थेट स्टेनलेस स्टीलच्या डब्ब्याने ग्राहकांपर्यंत पोहचवणार

PMC faces storage & disposal challenge

PUNE: The Pune Municipal Corporation (PMC) has a tricky plastic problem — how to store and eventually dispose of the tonnes of plastic collected from across the city in the build-up to the ban.

An evening dedicated to furry friends in Kalyani Nagar

Pet parents in Pune were in for some treat when the owners and their pooches gathered at city-based café in Kalyani Nagar to walk the ramp.

BJP seeks action against PMPML for delay in response to proposal


Pune, Nashik SIC benches face backlog of over 16,000 cases

One of the major reasons behind the backlog is that the post of State Information Commissioner at the Nashik bench has been vacant for 13 months. The Pune State Information Commissioner, Ravindra Jadhav, holds dual charges of both State Information Commissions.

महिला प्रवाशांनी वाचला अडचणींचा पाढा

'पीएमपी'तर्फे सुसंवाद दिनाचे आयोजन

थांब्यासमोर पीएमपी बस थांबत नसल्याने ती पकडण्यासाठी ज्येष्ठ महिलांना धावपळ करावी लागते. बस दरवाज्यांच्या पायऱ्यांवर तरुण-पुरुष प्रवासी उभे असल्याने थांब्यावर उतरताना महिला प्रवाशांना अडचण येते, ज्येष्ठ महिलांना बसायला जागा मिळत नाही, अशा अनेक तक्रारी महिला प्रवाशांनी मंगळवारी केल्या.

#MonsoonSession सोळा वर्षांनंतर तरी बीडीपीचा प्रश्‍न सुटेल का?

पुणे - शहरातील जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणाचा मोबदला काय आणि किती द्यावा, हा ‘गहन’ प्रश्‍न सोडविणे राज्य सरकारला गेल्या १६ वर्षांत जमले नाही. त्‍यामुळे पुण्यातील ४८ ते ५० हजार कोटी रुपये किमतीची ९७६ हेक्‍टर जागा पडून आहे आणि त्यावर अतिक्रमणे होऊ लागली आहेत. 

शिक्षण, रोजगारासाठी ‘सारथी’ची स्थापना

पुणे - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ अर्थात ‘सारथी’ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

#MissionAdmission अकरावीसाठी ७६ हजार अर्ज

पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या शाखांसाठी असलेल्या एकूण ९६ हजार ३२० जागांसाठी सुमारे ७५ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. विज्ञान शाखेच्या ३९ हजार ९० जागा असून त्यासाठी ३२ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

[Video] भुयारी मार्ग बनला कचराकुंडी !

पुणे - केशवराव जेधे उड्डाण पुलाखालील भुयारी मार्गात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तसेच जुगारी, तळीराम आणि नशेखोरांच्या टोळक्‍यांच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे भुयारी मार्ग जणू कचराकुंडीच बनला आहे. 

लावणीवर थिरकली महिलांची पावले

पुणे - महिलांनी वाजविलेल्या शिट्ट्या, टाळ्या अन जल्लोषपूर्ण आवाज बालगंधर्व रंगमंदिरात दुमदुमत होता. "या रावजी, बसा भावजी', "माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू, बाई देव पावला गं', "झाल्या तिन्ही सांजा', "मला जाऊ द्या ना घरी', "विचार हाये पक्का', यांसारख्या रंगतदार लावण्या रंगमंचावर एका पाठोपाठ सादर होत होत्या अन ढोलकीचा कडकडाटही घुमत होता. 

पुण्यात २६ दिवसांत १४६ मिलिमीटर पाउस

पुणे - पुण्यात २६ दिवसांत १४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २६.२ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. पुढील चार दिवसांत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या एक-दोन सरी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारी बारापासून पावसाला सुरवात झाली. कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी, पाषाण, शिवाजीनगर, नगर रस्ता, बाणेर, बालेवाडी या उपनगरांसह शहरातील मध्य वस्तीतील पेठांमध्ये पावसाचा जोर मोठा होता. तासभर पडलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. संध्याकाळनंतर परत पावसाच्या हलक्‍या सरी पडू लागल्या. रात्री उशिरापर्यंत या सरी पडत होत्या. 

पुणे रत्न पुरस्कार विद्या बाळ यांना प्रदान

पुणे - ‘‘एखाद्या क्षेत्रात आल्यानंतर प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. अनेक वर्ष पैसा, प्रसिद्धीपासून लांब राहून कार्यकर्त्या म्हणून काम करत राहणे कठीण असते. लढा देणाऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम स्त्रियांची चळवळ करत असून, यामध्ये समाजातील विविध घटकांनी सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले.

ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ऑनलाइन बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सध्या एक इमारत असलेले गृहप्रकल्प आणि औद्योगिक बांधकामांना बुधवारपासून (ता. २७) परवानगी देण्यास सुरवात करण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानातील शौचालये हवेत!

येरवडा : ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत येरवडा भागात बांधलेली सुमारे एक हजार वैयक्तिक शौचालये केवळ कागदावर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक शौचालय रेखांश व अक्षांश घेऊन बांधले आहेत. त्यामुळे वैयक्तिक शौचालयांमध्ये गैरव्यवहार झाले नसल्याचा निर्वाळा सहायक महापालिका आयुक्त विजय लांडगे यांनी दिला आहे. येरवडा परिसरात वाल्मिकी आंबेडकर घरकुल योजना व शहरी गरीबांसाठी घरकुल योजना (बीएसयुपी) अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुले बांधली आहेत. या योजनेमध्ये शौचालय बांधणे सक्तीचे होते.

पायाभूत सुविधांची पीएमआरडीएकडून पाहणी

वाघोली- वाघोली येथील वाहतुकीची कोंडी, रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधांची पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते आणि शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी माहिती घेऊन पाहणी केली. वाघोली ग्रामपंचायतीने रस्त्यांचे काम करण्यासाठी पीएमआरडीएकडे मागणी केलेल्या रस्ता हस्तांतरणाचे पत्र गित्ते यांनी ग्रामपंचायतीला दिले. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा चौकाचे विस्तारीकरणाचे टेंडर आणि नवीन पाण्याच्या पाइपलाइनचे टेंडर लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन गित्ते यांनी यावेळी बोलताना दिले.

आता व्हॉट्सअॅपवरील फोटो, व्हिडीओ फोनच्या गॅलरीत दिसणार नाहीत !

मुंबई : व्हॉट्सअॅपवरील फोटो किंवा व्हिडीओ डाऊनलोड केल्यानंतर ते आपल्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये दिसतात. तसे थेट गॅलरीत कोणताही फोटो किंवा व्हिडीओ दिसू नये म्हणून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणले आहे. अँड्रॉईड यूझर्सना नव्या अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध करुन दिले जाईल.

Reasonably priced beverages at Pune airport

PUNE: Now, you can have a cup of tea or coffee at the airport without burning a hole in your pocket.

Tuesday, June 26, 2018

HC LAYS DOWN RULES FOR APPOINTING TREE AUTHORITY MEMBERS

City-based activist had approached court with PMC’s inconsistencies

FSSAI Gets Serious Against Food Adulteration, Proposes Life Term, Rs 10 Lakh Fine For Culprits

The Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has proposed stringent punishment of fine of Rs 10 lakh and imprisonment up to life term for those adulterating foodstuff. Besides, the regulator has also suggested creating a 'Food Safety and Nutrition Fund' to support promotional and outreach activities among food businesses and consumers.

food adulteration

राज्यातील प्राध्यापकांसाठी ‘टॅफनॅप’ सरसावली

शिक्षण विभागाच्या निष्क्रियतेबाबत संताप; अन्यायाविरोधात न्यायालयीन लढाईच्या तयारीत

महाविद्यालय बंद करणे, एकाचवेळी अनेक प्राध्यापकांना काढून टाकणे, वेतन थकवणे अशा प्रकारांमुळे राज्यभरातील प्राध्यापक मेटाकुटीला आले आहेत. सातत्याने आवाज उठवूनही शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नसल्याने प्राध्यापकांवरील अन्यायाविरोधात टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहे. राज्यभरातील विनाअनुदानित संस्थांतील गैरकारभारामुळे प्राध्यापकांमध्ये सरकारबाबत संतापाचे वातावरण आहे.

#SchoolTransport असुरक्षित वाहतुकीची ‘शाळा’!

पुणे - सकाळची वेळ.. येरवड्यातील गणेशनगर येथील वर्दळीचा रस्ता.. शाळेत सोडण्यासाठी तीन मुलांना घेऊन एक दुचाकीस्वार निघाला होता.. अचानक एक मुलगा गाडीवरून खाली पडला.. गाडी थांबली.. पडलेला मुलगा उठला आणि पुन्हा गाडीवर बसून चौघंही निघून गेले.. अवघ्या काही क्षणांमध्ये घडलेला हा प्रकार! मुलांची शाळेत ने-आण करणं किती जिकिरीचं होत चाललं आहे, याचंच हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ‘विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक’ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! शाळेत न्यायला-आणायला रिक्षा किंवा स्कूल बस नसेल, तर तुम्ही लहान मुलांची सुरक्षित वाहतूक कशी करता? सूचना पाठवा webeditor@esakal.com वर!