Friday, June 29, 2018

पालिकेची आमदारांवर ‘कृपा’

प्रति चौरस फूट १४ पैशांनी जागा दिल्याचा विरोधकांचा आरोप

शहरातील रस्यावरील पथारी व्यावसायिकांकडून पालिका प्रशासन दिवसाला शंभर रुपये शुल्क वसूल करीत असताना दुसरीकडे हडपसरमधील आमदारांवर कृपादृष्टी दाखवून प्रशासनाने त्यांना १४ पैसे प्रति चौरसफूट दराने जागा दिल्याचा आरोप गुरुवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आला. प्रशासनाच्या या चुकीच्या कारभारावर टीकेची झोड उठवून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेतील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तात्पुरत्या स्वरुपात ही जागा देण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाने केला. मात्र, कोणत्या नियमाने ही जागा देण्यात आली, याचा खुलासा अधिकाऱ्यांना करता आला नाही.

No comments:

Post a Comment