पुणे - सकाळची वेळ.. येरवड्यातील गणेशनगर येथील वर्दळीचा रस्ता.. शाळेत सोडण्यासाठी तीन मुलांना घेऊन एक दुचाकीस्वार निघाला होता.. अचानक एक मुलगा गाडीवरून खाली पडला.. गाडी थांबली.. पडलेला मुलगा उठला आणि पुन्हा गाडीवर बसून चौघंही निघून गेले.. अवघ्या काही क्षणांमध्ये घडलेला हा प्रकार! मुलांची शाळेत ने-आण करणं किती जिकिरीचं होत चाललं आहे, याचंच हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ‘विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक’ हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय! शाळेत न्यायला-आणायला रिक्षा किंवा स्कूल बस नसेल, तर तुम्ही लहान मुलांची सुरक्षित वाहतूक कशी करता? सूचना पाठवा webeditor@esakal.com वर!


No comments:
Post a Comment