वाघोली- वाघोली येथील वाहतुकीची कोंडी, रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधांची पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते आणि शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी माहिती घेऊन पाहणी केली. वाघोली ग्रामपंचायतीने रस्त्यांचे काम करण्यासाठी पीएमआरडीएकडे मागणी केलेल्या रस्ता हस्तांतरणाचे पत्र गित्ते यांनी ग्रामपंचायतीला दिले. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा चौकाचे विस्तारीकरणाचे टेंडर आणि नवीन पाण्याच्या पाइपलाइनचे टेंडर लवकरच काढण्यात येईल, असे आश्वासन गित्ते यांनी यावेळी बोलताना दिले.


No comments:
Post a Comment