Saturday, June 30, 2018

खासगी बसचा प्रस्ताव बासनात

'पीएमपी'ने ठरवून दिलेल्या मार्गांवरच सेवा देण्याची भूमिका

सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षांनी धरलेला खासगी कंपनीच्या प्रस्तावाचा आग्रह शुक्रवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पूर्णत: फेटाळून लावला. खासगी कंपनी इच्छुक असलेल्या मार्गावर नाही, तर पीएमपीने ठरवून दिलेल्या मार्गावरच बससेवा चालविता येऊ शकेल असे स्पष्ट करताना त्याचा सविस्तर प्रस्ताव पालिकेला नाही, तर पीएमपीला सादर करावा, अशी ठाम भूमिका पीएमपीने घेतली. त्यामुळे, भाजप शहराध्यक्षांनी पुढाकार घेतलेला हा प्रस्ताव आता मागे पडण्याची चिन्हे आहेत.

No comments:

Post a Comment