Wednesday, June 27, 2018

पुण्यात २६ दिवसांत १४६ मिलिमीटर पाउस

पुणे - पुण्यात २६ दिवसांत १४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २६.२ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. पुढील चार दिवसांत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या एक-दोन सरी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारी बारापासून पावसाला सुरवात झाली. कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी, पाषाण, शिवाजीनगर, नगर रस्ता, बाणेर, बालेवाडी या उपनगरांसह शहरातील मध्य वस्तीतील पेठांमध्ये पावसाचा जोर मोठा होता. तासभर पडलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. संध्याकाळनंतर परत पावसाच्या हलक्‍या सरी पडू लागल्या. रात्री उशिरापर्यंत या सरी पडत होत्या. 

No comments:

Post a Comment