एखाद्याकडे ‘शतप्रतिशत’ काम सोपवले आणि त्याने ते चोखपणे करावे, अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? एखाद्या महत्त्वाच्या कामात काही त्रुटी राहिली तर साहजिकच इतर कामांपेक्षा त्याकडेच तातडीने लक्ष जाते, ही मानवी प्रवृत्ती आहे. अशावेळी आम्ही एवढे चांगले केले त्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही त्रुटींवरच का बोट ठेवता, असे म्हणणे योग्य ठरत नाही. पुणे ही सांस्कृतिक-शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहराच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या महापालिका भवनाचे उद्घाटन होत असताना पहिल्या पावसात उपराष्ट्रपतींसमोरच सभागृहाला लागलेली ‘गळती’ सर्वांना खटकणे साहजिक आहे. या गळतीकडे एक उदाहरण म्हणून पाहून महापालिकेच्या वतीने सुरू असणाऱ्या सर्वच कामाच्या दर्जा, कार्यपद्धतीकडे अधिक नेटकेपणाने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
No comments:
Post a Comment