Friday, June 29, 2018

नव्या इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटलाही घाईच

पालिकेला सात दिवसांत हवे ऑडीट
पुणे  : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या घाईमुळे घाई गडबडीने काम उरकणाऱ्या पालिका प्रशासन आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही इमारतीच्या स्ट्रक्‍चरल ऑडीटचीही घाई झाल्याचे समोर आले आहे. या नवीन विस्तारीत इमारतीचे कॉम्प्रेहेन्सीव स्ट्रक्‍चर ऑडीट सात दिवसात करून द्यावे असे पत्र महापालिका प्रशासनाने गुरूवारी तातडीने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला दिले आहे. त्यामुळे सात दिवसात हे ऑडीट योग्य पध्दतीने होणार की संबधिताना क्‍लीन चीट देण्यासाठी ही गडबड केली जात आहे असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेअ. दरम्यान, या पत्रात, उद्घाटनाच्या दिवशी इमारतीमध्ये एका नव्हे तर दोन ठिकाणी पाणी गळती झाल्याचे नमूद केले असल्याने दुसरी गळती नेमकी कोठी झाली याबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

No comments:

Post a Comment