घोरपडी येथील सोलापूर रेल्वे लाइनवर उभारण्यात येणाऱ्या नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरणारी १६ अतिक्रमणे पुढील १५ दिवसांत तातडीने हटविण्याचा महत्त्वाचा निर्णय महापालिकेतील बैठकीत घेण्यात आला. सामाजिक न्यायमंत्री आणि स्थानिक आमदार दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पालिकेत बैठक झाली. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त सौरभ राव, महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला, स्थानिक नगरसेविका मंगला मंत्री, लष्कर, रेल्वे प्रशासनाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment