महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील पीएमपीचे बसस्टॉप या भागात असलेल्या टपळे गॅरेजच्या जागेत हलवून तेथून बस सुटण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत झाली असली, तरी या रस्त्यावरून बस चालविताना अनेक अडचणी येतात. हा रस्ता दुहेरी असल्याने सतत येथे वाहनांची वर्दळ असते. तसेच या परिसरात होत असलेल्या पार्किंगमुळे वाहनांसाठी रस्ता कमी पडतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा रस्ता 'एकेरी' (वन वे) करावा, असे पत्र पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पालिकेला दिले आहे. हा रस्ता एकेरी करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून अभिप्राय मागविण्यात आला असून त्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
No comments:
Post a Comment