Friday, June 29, 2018

एलईडी प्रकल्पाची चौकशी

महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि देशभरात विविध पुरस्कारांनी नावाजलेल्या 'एलईडी' प्रकल्पांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे महापालिका आयुक्त सौरभ राव या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामधून नेमकी किती वीज बचत होते, याच्या तपासणीसाठी 'कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग' (सीईओपी) या संस्थेकडून या योजनेचे संपूर्ण 'ऑडिट' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय या प्रकल्पाच्या निविदा, ठेकेदार कंपनीला देण्यात आलेले कार्यादेश, कंपनीला अदा करण्यात येत असलेली रक्कम याचेही महापालिकेकडून 'ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment