पुणे - महापालिका प्रशासनाकडून पाच वर्षांपूर्वी झालेली ‘प्रिंटिंग मिस्टेक’ राज्य सरकारनेही दुरुस्त न केल्याने शहराच्या जुन्या हद्दीतील वाडे, सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला आहे. ‘ही चूक दुरुस्त कधी होणार’, याची मध्यवस्तीतील नागरिक वाट पाहत आहेत. शहरात ३० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या इमारतींची संख्या जवळपास ३० टक्के आहे. पुणे महापालिकेच्या नव्या नियमावलीस मान्यता देताना राज्य सरकारने ‘ड’ वर्ग महापालिकेचे नियम ‘ब’ वर्ग महापालिकेला लागू केल्यामुळे हा सर्व गोंधळ झाला असल्याचे बोलले जात आहे. ‘प्रिंटिंग मिस्टेक’ कायम राहिल्याने शहराच्या जुन्या हद्दीतील रहिवाशांच्या हाती फक्त धुपाटणे राहिले.


No comments:
Post a Comment