मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार; सुमारे 1 लाख 43 हजार मिळकती
पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील मिळकतींची नोंद करण्यासाठी ‘ग्लोबल इन्फर्मेशन सिस्टिम’ (जीआयएस) यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय मिळकतकर विभागाने घेतला आहे. पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करून या गावातील मिळकतदारांना मिळकतकराची बिले देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या एक लाख 43 हजार मिळकतींचे जीआयएस मॅपिंग पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे.पालिकेच्या हद्दीलगत असलेल्या 11 गावांची समावेश पालिकेत करण्याची अधिसूचना ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने काढली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या गावांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सेवा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे.
No comments:
Post a Comment