Friday, August 24, 2018

पुणे वृत्तपत्र संघाच्या वतीने आजी-माजी अध्यक्षांचा सत्कार

पुणे : पुणे वृत्तपत्र संघाच्या वतीने श्रावण मासानिमित्ताने यंदाही अप्पा बळवंत चौकात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी पुणे वृत्तपत्र संघाच्या आजी-माजी अध्यक्षांना सन्मानचिन्ह देऊन ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पन्नालाल मुनोत, रमेश बोराटे, विजय पारगे या अध्यक्षांनी मनोगतातून व्यवसायातील अनुभव कथन केले. यावेळी संघटनेचे वरिष्ट उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकूले उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार चंदन कोहाळकर यांनी केले. नियोजन विभाग प्रमुख व कार्यकारणी सदस्य अध्यक्ष रोहित गणेशकर, उपाध्यक्ष संदीप शिंदे, विश्‍वास शेवाळे, मंदार शिंदे, संतोष लांबे, शाम धायगावे, गिरीश नगरकर, शिवराज ननावरे, संतोष शेटे, बंटी मोटे, यशवंत बोगम, अरुण धुमाळ, बाळासाहेब ढमाले यांनी केले.

No comments:

Post a Comment