Friday, August 17, 2018

कात्रज-कोंढवा रस्ता धोकादायक

रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड चिखल, सलग नसलेले रस्ता दुभाजक, पावसामुळे पडलेले खड्डे, रस्त्यावर पसरलेली खडी, असखल रस्ता आणि मोठ्या प्रमाणावर होणारी अवजड वाहनांची वाहतूक या सर्व कारणांमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एकीकडे कात्रज-कोंढवा रस्त्याची अशी धोकादायक परिस्थिती असताना, महापालिका प्रशासनाकडून मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यास विलंब होत आहे.

No comments:

Post a Comment