Friday, August 17, 2018

क्षमतेपेक्षा जास्त दिलेले प्रवेश होणार रद्द

अकरावी प्रवेश : भरारी पथके करणार महाविद्यालयांची तपासणी
पुणे – राज्यात प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांमधील प्रवेश रद्द करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी कोचिंग क्‍लासेसशी साटेलोटे करत अनेक ग्रामीण भागांतील महाविद्यालये ऑनलाईन प्रवेशाच्या बाहेर राहत क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. याबाबत शासनाकडे तक्रारीही प्राप्त झाल्या असून त्यानंतर हे प्रवेश रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment