पुणे - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ हा लोकमान्य टिळक यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवारी (ता. १) त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य माय बर्थराइट’ हा चित्रपट रसिकांना यू-ट्यूबवर सकाळी सात वाजल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment