येरवडा - विश्रांतवाडी येथील टॅंक रस्त्यालगतच्या खासगी रुग्णालयाच्या रचनेत बदल करण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित रुग्णालयाने पालिकेची परवानगी घेतली; मात्र बांधकाम रचना आणि नकाशाचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयाचे स्वतःचे वाहनतळही नसतानाही ते नकाशात दाखविण्यात आले आहे. रुग्णवाहिकेसाठी रस्तासुद्धा नाही. नगरसेवक आणि एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संगनमताने या रुग्णालयाच्या फेरफार नकाशाला मंजुरी दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
No comments:
Post a Comment