Monday, June 25, 2018

शाफ्टच्या कामाला स्वारगेटला सुरुवात


पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट येथील प्रस्तावित भुयारी स्टेशन आणि मल्टिमोडल हबसाठी मोठा खड्डा (शाफ्ट) घेण्याच्या कामास महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने नुकतीच सुरुवात केली आहे. हे काम करताना आजूबाजूची माती खड्डा घेण्याच्या कामात ढासळू नये, यासाठी स्लॅब तयार करण्याचे काम महामेट्रोने सुरू केले आहे. येत्या आठवड्यात पिंपरी ते स्वारगेट डेपोच्या दृष्टीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरही याच स्वरूपाचे काम केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment