पुणे : पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे महापालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकार्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्टचे अॅड. मिलिंद पवार, राजेंद्र गुप्ता, सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम यांनी ही माहिती दिली.
MH 12 News | All about Pune. News Aggregator for stories related to PUNE, City popularly known as Oxford of the East! It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - md.amol@gmail.com [Beta Version]
Thursday, August 30, 2018
पुण्यात आता अशांतता नांदते
पुणे – शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुरक्षितता, निवांतपणा, मोठे रस्ते, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञानाचे हब, नैसर्गिक सुबत्ता, सांस्कृतिकदृष्ट्या एकजिनसी अशी पुण्याची ओळख काही घटनांमुळे बदलत चालली आहे. माओवादी, दहशती कारवाया, चळवळीतील कार्यकर्त्यांचे खून या सगळ्यांनी पुण्यात शांतता नांदते असे म्हणणे आता चुकीचे ठरणार आहे.
वैकुंठ स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य
पुणे – शहरातील महापालिकेची प्रमुख स्मशानभूमी असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्मशानभूमीच्या स्वच्छता व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात असतानाही या ठिकाणी चिखल, साचलेला कचरा, तसेच ड्रेनेज वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, या दूरवस्थेवरून मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत प्रशासनावर चांगलेच धारेवर धरण्यात आले.
स्वयंशिस्त अन् पीएमपीच फोडेल कोंडी !
वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य पुणेकर हैराण अन् अस्वस्थ झाले आहेत. त्याचा परिणाम नोकरी-व्यवसायासह वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यावरही होत आहे. महापालिका आणि पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेगाने पावले उचलण्याची गरज ‘सकाळ’कडे शेकडो नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, सक्षम सार्वजनिक वाहतुकीबरोबरच वाहनचालकांनी नियमांचे पालन करण्याचीही गरज मांडली.
Illegal parking tackled on Aundh-Wakad Rd
People plying their vehicles on Aundh-Wakad Road have some good news in store — the rampant problem of haphazard parking near the Maharaja Sayaji Gaikwad Udyog Bhavan Road is finally being tackled by the authorities, after numerous complaints had gone unheeded for a while.
PMC plans check on 1lakh electric poles in 2 weeks
Aweek after a first information report (FIR) was registered against the engineer (electrical) of the Pune Municipal Corporation (PMC) for allegedly causing death due to negligence of a 12-year-old boy Prithviraj Vishal Chavan in Warje last week, the electricity department of the PMC has decided to conduct tests on all the electric poles of streetlights across the city within the next 15 days.
PMC all set to introduce maternity care van service
Pune: The Pune Municipal Corporation (PMC) has decided to introduce a maternity care van service to offer timely assistance in critical cases of pregnancy. Initially, two fully-equipped vehicles will be available on call 24X7.
The standing committee of the civic body approved the proposal on Tuesday. The proposal had been approved by PMC’s women and child welfare committee last week. Nearly Rs20 lakh will be diverted from other works in the budget for the maternity care vans.
The standing committee of the civic body approved the proposal on Tuesday. The proposal had been approved by PMC’s women and child welfare committee last week. Nearly Rs20 lakh will be diverted from other works in the budget for the maternity care vans.
मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या मार्गातील मुळा मुठा नदीवरील पुलाच्या कामाला मंजुरी
मांजरी बुद्रुक ते मांजरी खुर्द या रस्त्यावरील मुळा मुठा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावरून वाहतूक होत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यावर पाणी येत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक बंद होत होती. आमदार योगेश टिळेकर यांनी केंद्र सरकारच्या नाबार्ड योजनेतून या पुलाची उभारणी व्हावी म्हणून पत्रव्यवहार करून राज्य शासनाकडे मागणी केला होता.
Metro stn to come up in front of PMC building
PUNE: The MahaMetro will construct a station in front of the ..
Pune: With sale of onions, Maha Farmers Producer Company takes baby steps into retail
The Maha Farmers Producer Company (MahaFPC) — the umbrella organisation of farmers, producers and companies (FPCs) in the state — has entered an agreement with the chicken retailer, Amir Chicken, to retail onions at the latter’s outlets
Pune: 25 health & wellness centres to provide a range of medical services
The state government is planning to transform health sub-centres into health and wellness centres across several districts in a phased manner. At least 25 health and wellness centres will be set up in Pune district, while another 90 will be set up in Satara, Dr Sanjay Deshmukh, deputy director, (Pune circle), told The Indian Express.
पुण्यात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी
राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरूच आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फायदा स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या वाढीस होत आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यात पंचवीस बळी गेले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात १३० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी पैकी पंधरा जणांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.
बाकड्यांची गरज आहे का?
नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतून बाकांची खरेदी करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, बाकांची नागरिकांना खरंच गरज आहे का, हे तपासून पाहणे गरजेचे आहे,' असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
‘कॉल ड्रॉप्स’ला दोन टक्क्यांची कॅप
टेलिकॉम सेवा पुरवणाऱ्या विविध कंपन्यांची कनेक्शन्स वापरणाऱ्या कंपन्यांना कॉल ड्रॉपचा दर दोन टक्क्यांहून अधिक असता कामा नये, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक कॉल ड्रॉप झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करणार असल्याचेही 'ट्राय'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोडींमुक्त हिंजवडीसाठी ‘आयटी’ लढा
हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात आणि ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना येत असलेले अपयश लक्षात घेऊन हिंजवडी परिसरात काम करणारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो कर्मचारी (आयटिअन्स) वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एकवटले आहेत. ‘फ्री अप हिंजवडी’ या मोहिमेद्वारे लढा देण्यास सुरुवात झाली असून अवघ्या चार दिवसांत तब्बल १२ हजार जणांनी ऑनलाइन माध्यमातून स्वाक्षरी करत वाहतूक कोंडीचा निषेध केला.
प्रदूषणाच्या ‘स्टार रेटिंग’ उपक्रमात 21 कंपन्या
पुणे : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतेच राज्यातील औद्योगिक प्रदूषणाबाबतचे ‘रिपोर्ट कार्ड’ जाहीर करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील 45.1 टक्के कंपन्या या ‘थ्री स्टार’ म्हणजेच कमी प्रदूषक असून, सुमारे 38.3 टक्के कंपन्या या एक स्टार म्हणजे सर्वाधिक प्रदूषक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्टार रेटिंग उपक्रमात पुण्यातील 21 कंपन्यांचा समावेश आहे. एकूणच कमी प्रदूषित कंपन्यांची संख्या जास्त असली, तरी तुलनेने कमी परंतु अत्याधिक घातक कंपन्यांचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.
भाजपच्या राजकीय श्रेयात ‘तो’ भुयारी मार्ग रखडला
हडपसर : सय्यदनगर रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूककोंडी सुटण्याकरिता दोन भुयारी मार्ग ओढ्याच्या ठिकाणी करणार असल्याची माहिती दिली, यावर खुलासा करताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फारूक इनामदार यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर आरोप करून भाजपच्या श्रेयाच्या राजकारणात भुयारी मार्ग राखडल्याचे सांगितले. इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे, असेही फारूक म्हणाले
पर्यायी रस्ते नसताना ओढ्यावर भुयारी मार्ग करण्याचा घाट यांनी घातला आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याने पूर येऊन दुर्घटना होऊ शकते. याकडे मात्र आमदारांनी दुर्लक्ष केले आहे, असेही फारूक म्हणाले
पीएमपीवर भरवसा ठेवू नका
पौडरस्ता - मोहिते महाविद्यालयामधील युवकांना खराडीला बुद्धिबळ स्पर्धेसाठी साडेनऊला पोचायचे होते. नेटवर सर्च केल्यावर, सात तीसला वारज्याहून निघणारी बस सात सदतीसला कोथरूड स्टॅंडमार्गे जात असल्याचे दिसले. पौडरस्त्यावरून थेट बस नव्हती. कोथरूड स्टॅंडला चौकशी केली, तेव्हा बसला टाइमटेबल नाही. भरवशावर राहू नका, हे उत्तर ऐकायला मिळाले. तासाभरात अगदी तुडुंब भरलेल्या तीन बस वाघोलीकडे गेल्या; पण खराडीची बस आली नाही. स्थानकावर लावलेल्या पीएमपीएल हेल्पलाइनचा नंबर कोणी उचलत नव्हते. ‘एसएमएस’चेही उत्तर आले नाही. बस गुगलवर असते; पण रस्त्यावर नाही, याचे प्रत्यंतर या युवकांना आले. अखेर या युवकांनी रिक्षाने खराडी गाठली; पण उशीर झाल्यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेता आला नाही.
पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांपासून मुक्ती शक्य (व्हिडिअो)
पुणे - नैसर्गिक घटकांचा वापर करून खड्डे बुजविण्यासाठी नवीन तंत्र विकसित करण्यात पुण्यातील पृष्ठभाग विलेपनतज्ज्ञ राजेश राठोड यांना यश आले आहे. या तंत्राद्वारे दुरुस्ती केलेले रस्ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे; तसेच जवळपास 30 टक्के खर्चाची बचत होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
मेट्रो मार्गावर इंटिग्रेटेड तिकिटिंग
पुणे - हैदराबादच्या धर्तीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गावर ‘इंटिग्रेटेड तिकिटिंग सिस्टीम’ राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे एकाच तिकिटावर प्रवाशांना मेट्रो, कॅब आणि पीएमपी बसमधूनही प्रवास करता येणार आहे.
अरुंद रस्ते, खड्डे अन् बेशिस्त वाहनचालक
रस्त्यांची अर्धवट कामे, अरुंद रस्ते, पावसामुळे पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते वाढले नाहीत; मात्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अशक्त झालेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे खासगी वाहनांकडे वळावे लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. पुणेकरांनी ‘सकाळ संवाद’ला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या विश्लेषणावरून हा निष्कर्ष निघाला आहे.
एकत्रित बैठकीचे मेट्रोचे आश्वासन
पुणे - मेट्रोचे काम करण्यापूर्वी जमिनीखाली असलेल्या विविध सेवा वाहिन्यांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम करताना काही ठिकाणी वेगळीच स्थिती असल्याचे आढळून आले आहे. या कामाचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी नगरसेवक व वाहतूक विभागाची एकत्रित बैठक घेण्याचे आश्वासन "महामेट्रो'कडून सर्वसाधारण सभेला देण्यात आले.
बेशिस्त महाभागांनी थकविले 29 कोटी
पुणे – वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवून कारवाई केली जाते. यात ऑनलाइन तसेच ई-चलनाद्वारे दंड आकारून तो वसूल केला जातो. पण, अशा बेशिस्त वाहतूक करणाऱ्या पुणेकरांकडे थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 29 कोटी रुपयांची थकबाकी झाल्याचे समोर आले आहे. आता ती वसूल करण्याचे “टार्गेट’ पोलिसांना देण्यात आले आहे.
मेट्रो, पीएमपीएमएल अधिकारी आयुक्तांचे ऐकत नाहीत
पुणे – आयुक्तांनी पत्र पाठवूनही महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या मुख्यसभेत “पीएमपीएमएल’ आणि “महामेट्रो’चे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे हे अधिकारी महापालिका आयुक्तांचे ऐकत नाहीत, अशी तक्रार नगरसेवकांनी मुख्यसभेत केली.
तीन नव्या मार्गावर धावणार “पीएमपी’
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांच्या सेवेसाठी काही मार्ग नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या बसची वारंवारता तीस मिनिटांपासून दोन तासांपर्यंत असून दि. 4 सप्टेंबरपासून या मार्गावर पीएमपी धावणार आहेत.
Canada is top pick of Pune immigrants
Canada is fast emerging as a favoured destination among Pune residents looking to immigrate in search of a better life.

Wednesday, August 29, 2018
लँग्वेज ऑलिंपियाडमध्ये पुण्याला सुवर्ण
ऋजुल गांधी, अंगीकार घोषने उमटवला ठसा
आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिंपियाडमध्ये भारताने आपला ठसा उमटवला असून, स्पर्धेत पुण्याच्या ऋजुल गांधी हिने सुवर्णपदक पटकावले. ऋजुलबरोबरच अंगीकार घोषनेही सुवर्णपदक पटकावले आहे. या दोघांच्या कामगिरीमुळे भारताने प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. याच स्पर्धेत अपर्णा गुप्ते हिने रौप्य आणि शिंजनी घोष हिने कांस्य पदक मिळविले आहे.
आंतरराष्ट्रीय लिंग्विस्टिक ऑलिंपियाडमध्ये भारताने आपला ठसा उमटवला असून, स्पर्धेत पुण्याच्या ऋजुल गांधी हिने सुवर्णपदक पटकावले. ऋजुलबरोबरच अंगीकार घोषनेही सुवर्णपदक पटकावले आहे. या दोघांच्या कामगिरीमुळे भारताने प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. याच स्पर्धेत अपर्णा गुप्ते हिने रौप्य आणि शिंजनी घोष हिने कांस्य पदक मिळविले आहे.
उत्सवी फलकबाजीने शहर विद्रूप
गेल्या काही वर्षांपासून शहरात दहीहंडी साजरे करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.
पुण्यातील हॉटेल, उपाहारगृहांचा ‘स्वच्छता दर्जा’ तपासणार!
हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी एफएसएसआयच्या संकेतस्थळाला भेट देऊन विहित नमुन्यातील अर्ज भरायचे आहेत.
#PuneTraffic कोंडी फोडण्यासाठी स्वयंसेवकांची फौज
वाघोली - वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुटी देण्याची वेळ आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, वाघोलीकरांची कोंडीतून सुटका करण्यासाठी ६० ते ७० स्वयंसेवकांची मदत घेण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे. वाघेश्वर मंदिर ते बी. जे. एस. महाविद्यालयाच्या दरम्यान कोंडीचे सहा ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
#PuneTraffic विळखा अतिक्रमणांचा
पुणे - शहराचा विस्तार होत असतानाच मध्यभागातील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासन, वाहतूक पोलिस कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाही. रस्त्यांवर आणि पदपथांवर वाढणाऱ्या अतिक्रमणांना लोकप्रतिनिधींकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
#KeralaFlood : पुणे महापालिकेकडून केरळला एक कोटी
पुणे - केरळला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीत दुपट्टीने वाढ, प्रसूतीसाठी महिलांना तातडीने मदतीसाठी दोन रग्णावाहिका, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
रखडलेल्या ‘जायका’ ला दे धक्का!
पुणे - मुळा-मुठा नदीसुधार योजनेसाठीच्या महत्त्वाकांक्षी ‘जायका’ प्रकल्पासाठी सुमारे दोन वर्षांनंतर सल्लागार नियुक्त केला जात आहे. या प्रक्रियेला विलंब झाल्याने हा प्रकल्प मदतीत मार्गी लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन वर्षांनी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे.


निम्म्या शाळांत सुधारणा आवश्यक
बिझनेस एथिक्स फाउंडेशन आणि हॉलमार्कतर्फे १३५ शाळांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले
पाच हजार सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत
पुणे जिल्ह्यात १६ हजार गृहनिर्माण संस्था असून, अनेक संस्थांनी त्यांचे पुनर्विकसन केले आहे. मात्र, काही संस्थांच्या पुनर्विकसनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे चार ते पाच हजार गृहनिर्माण संस्था पुनर्विकसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रशासनाने तयार केलेला डीपी मान्य करा
येवलेवाडीचा सर्वसाधारण सभेने गेल्या वर्षी मान्य केलेला अहवाल मान्य न करता पालिका प्रशासनाने तयार केलेला विकास आराखडा मान्य करावा, अशी एकमुखी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीसह, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासदांनी केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करून पालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाच्या जोरावर सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या डीपीला मान्यता दिली. साडेसात तास यावर जोरदार चर्चा झाली. आरोप, प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी या वेळी सभागृहात झडल्या.
शहरी गरिबांना उपचारासाठी मिळणार 2 लाखांचा खर्च
निराधार ज्येष्ठ, अनाथांना उत्पन्न दाखल्याची अट वगळली
पुणे – शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पॅनेलवरील खासगी रुग्णालयात अंतर्गत विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी एक लाखाची मर्यादा रक्कम दोन लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. योजनेअंतर्गत सभासदत्व मिळण्यासाठी वय वर्षे 60 पेक्षा जास्त वय असलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना व अनाथ मुलांना उत्पन्न दाखल्याची अट वगळण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
Power cut in Baner, Aundh & Pashan
Pune: A 132 KV Rahatani electricity supply line snapped at 9.15am on Tuesday leading to power failure in Baner, Balewadi, Pashan, Aundh, Sus road ...
पुणे – स्वारगेट चौकातील कोंडी “वठणीवर’
वाहतूक नियोजित, कारवाई सुरूच : कारवाई सुरूच
पुणे – वाहतूक विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमुळे इतरवेळी सातत्याने कोंडीत असलेला स्वारगेटचा मुख्य चौक मंगळवारी नियोजित सुुरू होता. ना गर्दी, ना जाम यामुळे दिवसभर वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, बेशिस्तांवर सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू होती.

Wagholi traffic snarls compel Lexicon school to declare a holiday
“It takes over an hour for them to reach Wagholi from Kharadi. The condition of the roads is bad and the traffic problem is massive. Keeping all this in ...
Experimental changes near Nal Stop spark traffic mess
Pratibha Joshi, a Kothrud traffic police inspector, said the department will synchronize traffic signals at Nal Stop and Mehendale garage chowk for ...
State offers Rs 185 crore for Chandni Chowk flyover
According to a survey of the civic administration, properties in Kothurd and Bavdhan would be demolished to construct service roads and bridges for ...
Pune promotes a plastic free environment
A Green Impact Fair which aimed to spread the joy of products which are up-cycled, eco-friendly and hand-crafted was conducted at Viman Nagar's ...
शहरबात : चर्चा भरपूर, कृती कधी होणार?
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, आयटी हब अशी ओळख असलेले पुणे शहर वास्तव्याच्या दृष्टीने देशात क्रमांक एकचे शहर ठरले.
खड्डे बुजविण्यासाठी डेडलाइन
वारजे - वारज्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने दररोज या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी थांबविण्यासाठी खड्डे त्वरित बुजवावेत, यासाठी प्रभाग क्र.३२ मधील राष्ट्रवादी चार नगरसेवकांनी महामार्ग प्राधिकरणाला चार दिवसांची मुदत दिली आहे. खड्डे बुजवले गेले नाही, तर आम्ही महामार्ग रोखून धरणार आहे, असे लेखी निवेदनही महामार्ग प्राधिकरणाला या नगरसेवकांनी दिले आहे.


बाजारांचे स्थलांतर कागदावरच
पुणे - सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी नाना, भवानी पेठेतील किराणा भुसार मालाचा बाजार गुलटेकडी येथे स्थलांतरित झाला; पण त्यानंतर टिंबर, लोखंड आदी बाजाराचे स्थलांतर न झाल्याने वाहतूक कोंडीतच मध्य पुणे अडकून पडले आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास होणाऱ्या उल्लंघनाने त्यात भर पडत आहे.


येरवड्यात वृक्षांवर कुऱ्हाड
येरवडा - वाडिया बंगला येथील खराडी ते शिवणे या शंभर मीटर रस्त्याच्या दरम्यान येणारे पावणेदोनशे वृक्ष काढणार आहेत. त्यामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. नगर रस्ता चार पदरी असताना पुन्हा नव्याने रस्त्याची काय गरज आहे, असा प्रश्न पर्यावरण संघटनांनी केला आहे.


If it’s not personal, it’s not for Lokshahi Din, says PMC
State govt circular from 2012 denying issues of ‘public interest’, has been cited, enraging civic activists.
चिनी वस्तूंचे आव्हान मोडून काढणारी संघटना
पुणे - सुबक तरीही स्वस्त असा लौकिक मिळविलेल्या शाडू मातीच्या चिनी वस्तूंचे आव्हान मोडून काढण्यात गुजरातेतील मोरबी गावाच्या परिसरातील उद्योगांनी यश मिळविले आहे आणि आता लवकरच या वस्तूंची निर्यातही मोठ्या प्रमाणावर सुरू होणार आहे.


Industry association raises pitch for PCB garbage depot removal
The Hadapsar Industrial Association is at loggerheads with the Pune Cantonment Board (PCB) over a garbage depot in the industrial estate.
Undelivered driving licences, RCs pile up at RTO
The Regional Transport Office (RTO), Pune, is saddled with over 20,000 driving licences and registration certificates not delivered to the applicants.

पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे धोक्यात
पुणे: पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांची पदे धोक्यात असून जात प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या नगरसेवकांचा निर्णय राज्य निवडणूक आयोगातर्फे घेतला जाण्याची शक्यता आहे. सात पैकी पाच नगरसेवकांनी आपले जात प्रमाणपत्र मुदतीनंतर सादर केली असून, उर्वरित दोघांची प्रकरणे कोर्टात प्रलंबित आहेत.
Tuesday, August 28, 2018
Maharashtra Governor reviews metro station plan near Raj Bhavan
Maharashtra Governor Ch Vidyasagar Rao convened a meeting with the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) officials recently, to discuss the Hinjawadi-Shivajinagar Metro route that is supposed to pass very close to the Raj Bhavan near the Pune University circle. It has been learnt that the governor’s office has agreed to give 375 square metres of its land along Baner Road, adjacent to Yashwantrao Chavan Academy of Development Administration (YASHADA), for the proposed Metro project.


सिव्हिल कोर्ट येथील मेट्रोच्या कामाचा श्रीगणेशा
वनाज ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गाचे काम सध्या जोमाने सुरू असताना सिव्हिल कोर्टापासून रामवाडीपर्यंतचे कामही महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी रस्त्यामध्ये बॅरिकेटिंग टाकून माती परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या कामाला सुरूवात झाल्यामुळे आता शहरात पिंपरी-चिंचवड ते स्वारग़ेट, वनाज ते सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्ट ते रामवाडी अशा तीनही पातळ्यांवर मेट्रो बांधकामाचे काम सुरू असणार आहे. सिव्हिल कोर्टाजवळील काम सुरू झाल्यामुळे या प्रकल्पाला गती प्राप्त होणार आहे. कारण याठिकाणी तीन इंटरचेंज मेट्रो स्टेशनस असणार आहेत, अशी माहिती वनाज ते रामवाडी (रिच 2) चे प्रकल्पाधिकारी अतुल गाडगीळ यांनी दिली आहे.


सोलर पॅनल लावण्यास महापालिकेकडून गती
पुणे महापालिकेच्या विविध इमारतींवर सोलर पॅनल लावण्याच्या योजनेला गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, घोले रोड आर्ट गॅलरी, नायडू हॉस्पिटल आणि कमला नेहरू रुग्णालयाच्या छतावर ही सोलर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या चारही ठिकाणी मिळून २६ हजार ४६० युनिट विजेची निर्मिती होणार असून यामुळे पालिकेच्या दर वर्षी विजेवरील खर्चाची १८ लाख ८५ हजार रुपयांची बचत होणार आहे. महाराष्ट्र रेस्को रूफ टॉप सोलर प्रा. लि. या कंपनीकडून हे काम करून घेतले जाणार आहे.
It's all problems, no solutions on pmc's online portal
Hadapsar resident lodged a complaint on August 20 about encroachments in his area, only to have officials close it without taking action. When he ...
Kharadi residents miffed about garbage strewn road
Pune: Senior citizen Kamalabai Galande, who lives in Sainathnagar, Kharadi, is livid about the piles of garbage on the road that leads to her home.
नळस्टॉप चौकाजवळ आणखी एक प्रयोग
पुणे - म्हात्रे पूल, मेहेंदळे गॅरेज, निसर्ग हॉटेलकडून येणाऱ्या वाहनांना पाडळे पॅलेस चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या वाहनांना पाडळे पॅलेस चौकाऐवजी नळस्टॉप चौकातून यू टर्न घेऊन गरवारे महाविद्यालय, सेंट्रल मॉल, नवी पेठ किंवा डेक्कन परिसरात जाता येईल. हा बदल प्रायोगिक स्वरूपात असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. २७) होणार आहे.
शहर भिक्षेकरीमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त सरसावले
पुणे शहर आणि उपनगरांमध्ये भिकार्यांचे मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे चित्र पहावयास मिळते. अपंग, लहान मुले, मुले कडेवर घेऊन भीक मागणार्या महिला चौकाचौकात पहावयास मिळतात. यापूर्वीही पुणे भिक्षेकरी मुक्त करण्यासाठी पोलिस, महापालिका व बालकल्याण विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, तो केवळ फार्स ठरल्याने चौकाचौकात भिक्षेकरी दिसून येत आहेत. अशा भिक्षेकर्यांवर पुणे पोलिस कारवाई करण्याच्या पावित्र्यात आहेत. पोलिस ठाण्यांनी यासंदर्भात आपापल्या हद्दीतील भिक्षेकर्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. त्याचा अॅक्शन प्लॅनही तयार करण्यात येत आहे. मात्र, या भिक्षेकर्यांना भीक मागण्यास भाग पाडणार्यांचे रॅकेटही उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे
अवैध फ्लेक्सबाजीला ऊत
अवैध ‘फ्लेक्सबाजी’ला ऊत आला असून, शहराचे विद्रूपीकरण वाढत चालले आहे. कारवाईबाबत मात्र प्रशासन सुस्त आहे, अशी टीका सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. अनधिकृत फ्लेक्स उभारणारे जागामालक आणि व्यावसायिक या दोघांवर फौजदारी करा, अशा स्वरूपाची ही मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


देहूरोड बायपासचे खड्डे चार दिवसांत बुजविणार
कात्रज-देहूरोड बायपासवर हिंजवडी ते जांभूळवाडीदरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होत आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील आयटीयन्ससह सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली. प्राधिकरणानेही येत्या चार दिवसांत खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले
नगर रस्त्यावर वाहनांच्या सात किलोमीटरच्या रांगा
वीकेंड, रक्षाबंधनाला गावी जाणाऱ्यांची गर्दी आणि पाऊस यामुळे शनिवारी दिवसभर महामार्गांवर वाहतूक कोंडीसदृश परिस्थिती होती. नगर रस्त्यावर चंदननगरपासून वाघोलीच्या दिशेला वाहनांच्या सहा ते सात किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांची कोंडी झाली.
खड्डे खोदल्यास मंडळाला २००० दंड
गणेशोत्सवासाठी मंडप टाकण्यासाठी फूटपाथ तसेच सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे खोदल्यास मंडळाला प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद महापालिकेने तयार केलेल्या मंडप धोरणात करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने हे धोरण तयार केले असल्याने न्यायालयाचा अवमान होऊ नये, यासाठी त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा विचार पालिकेने सुरू केला आहे.
1 सप्टेंबरपासून मीटरचे रिडिंग मोबाईलवर
ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन दिवसांत वीजबील होणार उपलब्ध
पुणे : ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी महावितरण प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 1 सप्टेंबरपासून वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग मोबाईलवर घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या आत वीजबील उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना त्यांच्या बिलांची माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे.
मोबाईल कंपन्यांना मनसेचा दणका
पुणे: जंगली महाराज रस्ता हा स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्याचे रस्ते, पदपथ, पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पदपथ मोठमोठाले करून रस्ता अतिशय अरुंद करण्यात आला आहे. परंतु ह्या पदपथाचा व पार्किंग खरच सामान्य नागरिकांना उपयोग होत असेल का ?? तर नाही. काही मोबाईल कंपन्या ह्या आपल्या मोबाईल व कंपनीची मोफत जाहिरात करण्या करिता दर शनिवार, रविवारी या पदपथावर दिवसभर अनधिकृत स्टेज/ मांडव उभारून स्टेज शो, पथनाट्य, गेम शो घेतात व मुलीही नाचवल्या जातात.
मिळकत कर सवलतीचे प्रकल्प सुरू आहेत का?
पुणे - मिळकत करातील सवलत घेण्यासाठी मिळकतधारकांनी सुरू केलेले गांडूळ खत प्रकल्प, सौरऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे प्रकल्प सुरू आहेत की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश कर आकारणी आणि संकलन विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. चालू आर्थिक वर्षात सुमारे ७४ हजार ३६० मिळकतींनी या सवलतीचा फायदा घेतला आहे.


मिळकतींना स्वतंत्र ओळखीची गरज नाही
पुणे - महापालिका हद्दीतील मिळकतींना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करीत आयुक्तांनी या प्रकल्पाची सुमारे दहा कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. या निर्णयाचे सजग नागरिक मंचने स्वागत केले आहे.
#PuneAirport विमान प्रवाशांची रांगेतून सुटका
पुणे - पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या लागणाऱ्या लांब रांगा लवकरच कमी होणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षा तपासणीसाठी आणखी दोन दरवाजे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विमानतळावर सुरक्षा तपासणीचे दहा दरवाजे होणार आहेत. तसेच, विमानतळातून बाहेर पडण्यासाठी तिसरा दरवाजा सुरु करण्यात येणार आहे.
'सिग्नल सिंक्रोनायझिंग' कागदावरच ! ; केबलचे काम प्रलंबित
पुणे : पुणेकर वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रस्त असताना, दुसरीकडे वाहतूक सुरळीत आणि जलद गतीने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेली "सिग्नल सिंक्रोनायझिंग' व्यवस्था अनेक वर्षांपासून कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. "सिग्नल सिंक्रोनायझिंग'साठी आवश्यक केबल टाकण्याचे कामही अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी काही वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
Saturday, August 25, 2018
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी त्रिसूत्री - डॉ. व्यंकटेशम
पुणे - अद्ययावत तंत्रज्ञान, अंमलबजावणी व लोकशिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर पोलिस प्रशासनाचा भर असेल. वाहनचालकांना दंड आकारणे, कारवाई करणे हा पोलिसांचा उद्देश नाही. मात्र, नागरिकांनीही वाहतुकीबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ब्रेकडाउनबद्दल कंत्राटदारांना नऊ कोटींचा दंड
पुणे - पीएमपीच्या ब्रेकडाउन होणाऱ्या बसमध्ये पाच खासगी कंत्राटदारांच्या बसची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासनाने त्यांना चार महिन्यांत नऊ कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे. तसेच, ब्रेकडाउनची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजनाही प्रशासनाने सुचविल्या आहेत.
सर्वांत लांब पल्ल्याची तोफ पुण्यात विकसित
पुणे - सर्वांत लांब पल्ल्याचे लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेली जगातील एकमेव तोफ (ऍटॅग्स) लष्करात येणार आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पुण्यातील पाषाण येथील अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (एआरडीई) म्हणजे आयुध संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. येत्या दोन वर्षांत ही तोफ वापरासाठी उपलब्ध होईल.
बाप्पा झाले "महाग'
पुणे - शाडू मातीच्या कमतरतेमुळे यंदा बाप्पांच्या मूर्ती महागल्या आहेत. सहा, नऊ इंचांपासूनच्या मूर्तीच्या किमती दोनशे, अडीचशे ते चारशे रुपयांपर्यंत आहेत. त्याहून अधिक उंचीच्या मूर्ती दहा हजारांच्या पुढे आहेत.
विक्रेत्यांनी शहर व उपनगरांमध्ये गणेशमूर्तींचे स्टॉल, दुकाने थाटली आहेत. शाडू माती गुजरात (भावनगर), राजस्थान व मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून येते; परंतु मातीची मर्यादित उपलब्धता, घाऊक विक्रेत्यांकडून घ्यावी लागणारी माती आणि कारागिरांचे पगार व रंगरंगोटीसह अन्य खर्चाचा ताळमेळ बसविताना कारखानदारांनी मूर्तीच्या घडणावळीसाठी पाच ते दहा टक्के वाढ केली असल्याचे पेण येथील कारखानदार आनंद देवधर यांनी सांगितले.
जुन्या हद्दीतील टेकड्यांवरही बीडीपी ?
पुणे - समाविष्ट गावातील बीडीपी (जैव वैविध्य उद्यान) आरक्षणाच्या मोबदल्याचा विषय निकाली निघाल्यामुळे आता शहरातील जुन्या हद्दीतील टेकड्यांबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व टेकड्यांना एकच नियम लागू करण्याच्या हेतूने जुन्या हद्दीतील टेकड्यांबाबतचा निर्णय सरकारने स्थगित ठेवला होता. त्यामुळे जुन्या हद्दीतील टेकड्यांवरही बीडीपी आरक्षण लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थायी लोकअदालतीत 10 खटले
पुणे - ऍड. असीम सरोदे यांच्यासोबत कार्यरत असलेल्या पुण्यातील विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज एकाच वेळी नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत स्थायी लोकअदालतमध्ये 10 खटले दाखल केले. आयएलएस महाविद्यालय, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत.
महापालिकेची सौर ऊर्जा 3.62 रुपये दराने खरेदी करणार
पुणे - महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींवर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून प्रतियुनिट 3 रुपये 62 पैसे दराने वीजखरेदी केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे महापालिकेची दरवर्षी सुमारे 19 लाख रुपयांची बचत होणार आहे.
महापालिकेच्या बालगंधर्व रंग मंदिर, घोले रोड आर्ट गॅलरी, नायडू रुग्णालय, कमला नेहरू रुग्णालय या मिळकतींच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे केला जाणार आहे. या प्रकल्पातून दरमहा सुमारे 26 हजार 460 युनिट इतकी वीजनिर्मिती होईल. यामुळे वीजबिलाच्या खर्चात बचत होणार आहे. हे प्रकल्प महाराष्ट्र रेस्को रुफ टॉप सोलर प्रा. लि. यांच्याकडून केला जाईल. हा प्रकल्प उभारणीचा खर्च संबंधित संस्था करणार असून, महापालिकेचा एक रुपया खर्च होणार नाही. केवळ छताच्या जागेचा वापर ती संस्था करणार आहे. त्यांच्याकडून ही वीजखरेदी करण्यासाठी करार करावा, प्रत्यक्ष वीजनिर्मितीनुसार प्रतियुनिट 3 रुपये 62 पैसे दराने वीजबिल देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर अवलोकनार्थ ठेवण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैेसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट 3 रुपये 20 पैसे अधिक 1 रुपया 18 पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त 13 पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा 2 रुपये 90 पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.
पुणे : ‘त्या’ मुलाचा मृत्यू पालिकेच्या हलगर्जीपणामुळे
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
वारजे माळवाडी परिसरात सायकलिंग करताना विजेच्या खांबाचा शॉक बसुन १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली होती. या मुलाच्या मृत्यू पालिकेच्या हालगर्जीपणामुळे झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुणे महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात दारू प्याल तर कारवाई, बापट यांचा इशारा
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून तो नेहमीच मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, उत्सवादरम्यान काही कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते, याचे भान कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे. गणेशोत्सवात दारू प्याल तर ११ दिवस पोलिस कोठडी दिली जाईल, असा इशारा पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
Highest pendency in Maharashtra: Pune struggles under burden of 2nd RTI appeals
By the end of July, over 8,000 Right To Information (RTI) second appeals were pending before the State Information Commissioner (SIC) bench in Pune, earning it the dubious distinction of being the SEC bench with the highest pendency in the state. Over 600 of the 8,746-second appeals in Pune date as far back as 2016, and are yet to be disposed of.


Pune: 250-bed naturopathy hospital and Gandhi memorial at Kondhwa gets go-ahead
The exhibition will also have items to illustrate Mahatma Gandhi’s experiments with naturopathy. An audiovisual documentation of Mahatma Gandhi’s views and philosophy will also be screened as part of his birth anniversary celebrations.
PMC aims at 1 MW solar power, to start with panels on 4 civic buildings
Setting up a target of 1 MW solar power generation, the Pune Municipal Corporation (PMC) administration sought permission from its standing committee to sign an agreement with the Solar Energy Corporation of India (SECI) to install solar panels on four civic-owned buildings. In a proposal tabled before the standing committee, municipal commissioner Saurabh Rao said the civic administration be allowed to give permission to the company concerned to install these panels.


Follow HC directives on pandals, Pune Mayor tells Ganesh mandals
Mayor Mukta Tilak on Friday urged Ganesh mandals to follow the directions issued by the Bombay High Court and Pune Municipal Corporation (PMC) regarding setting up of pandals. Ganesh festival will be celebrated from September 13 to 23. In a meeting with representatives of the Ganesh mandals, the mayor said the committees should ensure that no untoward incident takes place during the festival.


फक्त नागरिकांनाच दिसतात अवैध धंदे!
पुणे : अक्षय फाटक
नव्या पोलिस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर लागलीच पुणेकरांना सुरक्षितता देण्याचा आणि वाढता स्ट्रीट क्राईम रोखण्यासोबत अवैध धंद्यांना लगाम घालण्याचा निर्धार केला. त्यानुसार पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच बेकायदा चालणारे धंदे आढळल्यात तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही शहरवासियांना केले. चांगल्या कल्पनांना उचलून धरणारे, भरभरून प्रतिसाद देणार्या पुणेकरांनी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या धंद्याची माहिती तेवढ्याच तत्परतेने देणे सुरू केले.पंधरा दिवसांत 95 तक्रारी आल्या. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांना दिसणारे हे अवैध प्रकार पोलिसांच्या लेखी बहुतांश ठिकाणी आढळून आलेले नाहीत. कारण, पोलिस घटनास्थळी जाऊन आले. मात्र म्हणे, त्यांना या ठिकाणी अवैध असे काही सापडले नाही!
अनधिकृत होर्डिंग्जमुळे परिसर विद्रूप
कोंढवा : सुरेश मोरे
सुंदर प्रवेशद्वार आणि शहर परिसरात शिरताच लहानपणाच्या खाणाखुणांची ओळख सध्या लुप्त पावत चालली असून, हवाहवासा वाटणारा परिसर अनधिकृत होर्डिंग्जमुळे ओळखेनासा झाला आहे. 3 प्रभागात मिळून आवघ्या 104 होर्डिंग्जना पालिकेने परवानगी दिली असताना, परिसरात अनेक होर्डिंग्ज अनधिकृत पाहायला मिळत आहेत. यावर महापालिकेने धडक कारवाई केली नाही तर, परिसराचे विद्रुपीकरण वाढत जाणारा आहे.
पौडरोडला फ्लेक्सबाजीचे ग्रहण
पौडरोड : दीपक पाटील
पौडरोड परिसरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, मोकळ्या जागांवर तसेच पौडफटा, मोरे विद्यालय चौक, एमआयटी कॉलेज परिसर, वनाज कॉर्नर, शास्त्रीनगर, कोथरूड डेपो, चांदणी चौक या परिसरात अनधिकृत फ्लेक्सला उधाण आले आहे. या अनधिकृत होर्डिंग्जबाजीमुळे संपूर्ण परिसर विद्रुप झाल्याचे दिसून येत आहे. परिसर विद्रुपीकरणासह पालिकेची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणार्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
गणेश मंडळांना सोमवारपासून मिळणार विविध परवानग्या
पुणे : प्रतिनिधी
शहरातील गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून मंडळांना ऑनलाईन आणि ऑफलाईन परवानगी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध पाळून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने गणेश मंडळांना केले आहे.
कर्वे पुतळ्यासाठी ३० लाखांचे वर्गीकरण
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कर्वे रस्त्यावरील महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण तसेच त्यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून वर्गीकरण करुन हे पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या बृहत आराखड्यास मंजुरी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या बृहत् आराखड्याला विद्यापीठाकडून शिफारस व मंजुरी देण्यात आली असून, हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी महाराष्ट्र उच्च शिक्षण परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.
आमच्या भागात मेट्रो येणार का ?
मेट्रोच्या माहिती केंद्राला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मेट्रो कधी धावणार, डब्यांची रचना कशी असेल, मेट्रोला किती डबे असतील, किती प्रवासी त्यातून एकावेळी प्रवास करू शकतील, उन्नत मार्गावरील स्थानकांची रचना कशी असेल आदी प्रश्नांपासून ते आमच्या भागात मेट्रो येणार का? मेट्रो भुयारी मार्गातून कशी जाणार असे नानाविध प्रश्न महामेट्रोच्या माहिती केंद्रातील अधिकाऱ्यांना विचारण्यात येत आहेत. पुणेकरांच्या मनातील मेट्रोबाबतच्या शंकांचे योग्य निरसन होत असल्यामुळे मेट्रो प्रकल्पाबाबतची उत्सुकताही वाढली असून मेट्रो माहिती केंद्राला पुणेकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.
लोकमान्य टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक – पुणे महापालिका
मागच्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात नेमकी कोणी केली ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन वाद सुरु आहे. आता पुणे महानगरपालिकेने भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला असे म्हटले आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम १८९२ साली पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली अशी माहिती पुणे महापालिकेने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.
कर्वे रस्ता परिसरातील वाहतुकीत बदल
ट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत कर्वे रस्त्यावर वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले आहे.
मेट्रोच्या कामांमुळे होणाऱ्या कोंडीवर तोडगा
कर्वे रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे परिसरातील गल्लीबोळात होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या परिसरातील वाहतुकीमध्ये काही बदल करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. खिलारे पथावरील पाडळे पॅलेस चौक ते सेंट्रल मॉल या दरम्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
Friday, August 24, 2018
सल्लागार मंचाच्या स्थापनेची मागणी
'केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुणे शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यामुळे शहरासाठी तातडीने सल्लागार मंचाची स्थापना करावी,' अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाचे हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे.
[Video] अशी असेल शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रो (व्हिडिओ)
पुणे : जमिनीखालून 20 ते 28 मीटर खालून मेट्रोचा ट्युबच्या धर्तीवर दुहेरी भुयारी मार्ग साकारणार आहे. त्यासाठीच्या मशिनची किंमतच सुमारे 100 कोटी रुपये असेल ! भुयारी मार्गाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गाने मेट्रो असणार आहे.


पुण्यात मेट्रो स्थानकांवरही "सायकल शेअरिंग'
पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे.


पीएमपीच्या सव्वाशे बस रोज बंद पडतात
पुणे : देखभाल दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे, असा दावा पीएमपी प्रशासनाकडून केला जात असला, तरी गेल्या आठ दिवसांपासून दररोज सुमारे 125 हून अधिक बस बंद पडत आहेत. त्यात कंत्राटदारांच्या बसचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यांच्याकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्यामुळे प्रवाशांचे हाल वाढले आहेत.


सिंहगड रस्त्यावरील मेट्रोसाठी आणखी पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा
दुसर्या टप्प्यात विचार करणार; महामेट्रोचे पालिका सभासदाला पत्र
पुणे : गेल्या दहा वर्षात प्रचंड नागरीकरण झाल्याने सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता अथवा पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्पाचा स्वारगेट ते धायरी असा विस्तार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तरीही या प्रकल्पासाठी या भागातील नागरिकांना आणखी पाच ते सहा वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
SPPU to host five-day PEN international congress
The Savitribai Phule Pune University (SPPU) along with PEN International will host the 84th PEN International Congress in Pune from September 25 to 29. PEN International, an association of writers to promote friendship and intellectual co-operation among writers worldwide, is hosting its 84th conference in India for the first time.


विद्यापीठात भाषा उद्यान
जगभरातील सहा हजारांहून अधिक भाषा झाडांच्या माध्यमातून बोलत्या करण्याची किमया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साधली जाणार असून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या आवारात असणाऱ्या मोकळ्या जागेत जागतिक भाषा उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हवी ती भाषा ऐकता येणार आहेत. या उद्यानाच्या कामाला सुरुवात २८ सप्टेंबरपासून होणार असून, पुढच्या वर्षी ३० जानेवारीला ते प्रत्यक्षात अस्तित्वात येणार आहे.
12-week deadline to address civic issues: PMC
PUNE: Civic issues plaguing residents are likely to be resol ..
PMC chief refutes charges of indifference: ‘I am attached to Pune’
Under attack from corporators over the “lacklustre” approach of the Pune Municipal Corporation (PMC) administration, as well as his alleged lack of attachment towards the city, Municipal Commissioner Saurabh Rao on Thursday said he was attached to the city and had been a resident of Pune for four-and-a-half years.


सभागृह गरजले अन प्रशासनावर बरसले
महापालिकेच्या मुख्यसभेत एलईडी प्रकल्पातील गैरव्यवहार, ई- बसेस खरेदी, पाणी प्रश्न, वाहतुक, कर्मचार्यांच्या बदल्या आदी प्रश्नांबरोबरच नगरसेवकांची कामेच होत नसल्याची टिका करत भाजप नगरसेवकांनी मुख्यसभेत प्रशासनावर जोरदार आगपखड केली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनांचीही त्यांना साथ मिळाली. मात्र, तब्बल शंभरहून अधिक नगरसेवकांचे संख्याबळ असलेली सत्ताधारी भाजपाही अक्षरश हतबल झाल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
महापालिका आणि पोलिसांची हातमिळवणी
वाहतूककोंडी सोडविण्याचा निर्धार
शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 'महापालिकेचे अधिकारी महिन्यांतून एकदा पोलिस आयुक्तालयात बैठकीस जातील, तर पोलिस अधिकारी त्या पुढील महिन्यात महापालिकेत येतील. पोलिस आणि महापालिका यांच्यातील समन्वयाने एकत्रित काम करून शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,' अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 'महापालिकेचे अधिकारी महिन्यांतून एकदा पोलिस आयुक्तालयात बैठकीस जातील, तर पोलिस अधिकारी त्या पुढील महिन्यात महापालिकेत येतील. पोलिस आणि महापालिका यांच्यातील समन्वयाने एकत्रित काम करून शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,' अशी माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्वसाधारण सभेत दिली.
पथदिव्यांचे निम्मे खांब असुरक्षित
णे : शहरातील विविध भागातील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पथदिव्यांपैकी निम्म्या खाबांना 'अर्थिंग' नसल्याने ते असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ई-वेस्ट केंद्रात वर्षभरात एक हजार किलो कचरा संकलित
वर्षपूर्ती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, कार्ला, भाजे लेणी वास्तूदर्शन महागल
पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ
पुणे : केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ केली आहे. पुणे विभागातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, कार्ला लेणी आणि भाजे लेणी या वास्तूंचे प्रवेश शुल्क 15 रुपयांवरून 25 रुपये करण्यात आले आहे.
स्वाइन फ्लूचे सात रुग्ण
पुणे : शहरात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण आढळून आले आहेत. यंदा रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. तर, सध्या 12 रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांपैकी 7 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
अखेर मिळकतीवर क्रमांक टाकण्याची निविदा रद्द
आयुक्तांचा निर्णय; कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचा ठपका
पुणे : शहरातील मिळकतींवर ‘स्मार्ट डिजिटल डोअर नंबर’ टाकण्याच्या कामाची 10 कोटी रुपयांची निविदा आयुक्तांनी अखेर रद्द केली. निविदा प्रक्रिया राबवताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचा ठपका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांनी खात्यावर ठेवला आहे.
वाघोलीत दहा हजार वीजमीटर उपलब्ध करून देणार
वाघोली : ग्राहकांना सिंगल फेज मीटर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. वाघोली (ता.हवेली) विद्युत महावितरण शाखा अंतर्गत पंचेचाळीस हजार ग्राहक संख्या असून मोठ्याप्रमाणात नवीन ग्राहकांची मागणी वाढली आहे. मात्र चार-पाच महिन्यापासून सिंगल फेज मीटर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांना सिंगल फेज मीटर उपलब्ध करून द्यावे व वीज भरणा केंद्र सुरू करावे अशी मागणी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक, शिवदास पवार, सुधीर दळवी यांनी केली आहे.
पुणे वृत्तपत्र संघाच्या वतीने आजी-माजी अध्यक्षांचा सत्कार
पुणे : पुणे वृत्तपत्र संघाच्या वतीने श्रावण मासानिमित्ताने यंदाही अप्पा बळवंत चौकात सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. याप्रसंगी पुणे वृत्तपत्र संघाच्या आजी-माजी अध्यक्षांना सन्मानचिन्ह देऊन ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पन्नालाल मुनोत, रमेश बोराटे, विजय पारगे या अध्यक्षांनी मनोगतातून व्यवसायातील अनुभव कथन केले. यावेळी संघटनेचे वरिष्ट उपाध्यक्ष दत्ता पिसे, कार्याध्यक्ष अनंता भिकूले उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार चंदन कोहाळकर यांनी केले. नियोजन विभाग प्रमुख व कार्यकारणी सदस्य अध्यक्ष रोहित गणेशकर, उपाध्यक्ष संदीप शिंदे, विश्वास शेवाळे, मंदार शिंदे, संतोष लांबे, शाम धायगावे, गिरीश नगरकर, शिवराज ननावरे, संतोष शेटे, बंटी मोटे, यशवंत बोगम, अरुण धुमाळ, बाळासाहेब ढमाले यांनी केले.
11 गावांसाठी ‘जीआयएस’ यंत्रणा
मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार; सुमारे 1 लाख 43 हजार मिळकती
पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील मिळकतींची नोंद करण्यासाठी ‘ग्लोबल इन्फर्मेशन सिस्टिम’ (जीआयएस) यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय मिळकतकर विभागाने घेतला आहे. पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करून या गावातील मिळकतदारांना मिळकतकराची बिले देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायतीकडे नोंद असलेल्या एक लाख 43 हजार मिळकतींचे जीआयएस मॅपिंग पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे.पालिकेच्या हद्दीलगत असलेल्या 11 गावांची समावेश पालिकेत करण्याची अधिसूचना ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारने काढली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या गावांमध्ये आवश्यक त्या पायाभूत सेवा पुरविण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे.
आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली...
पुणे - रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत काय बोलायचे विचार करून आता मेंदूला खड्डे पडायची वेळ आली आहे...पुणे शहर खरंच ‘स्मार्ट’ होतय का ? सत्तेवर कोणीही आले तरी पावसाळ्यात खड्डे असतातच. खड्ड्यांच्या माध्यमातून अनेकांना पाठीचे - मणक्याचे आजार महापालिका भेट देत आहे...आकाशातील तारे ज्याप्रमाणे मोजता येत नाही तशीच अवस्था झालेल्या या खड्ड्यावर बोलायचे तरी किती... सिंहगड रस्ता भागातील नागरिक उमेश गोरे बोलत होते. गोरे यांच्याप्रमाणेच बहुतांश पुणेकरांची हीच भावना निर्माण झाली आहे.


#PMPIssue पीएमपी कर्मचाऱ्यांकडून सौजन्य टांगणीला!
पुणे - अर्धा-पाऊस तास भर पावसात पीएमपीची वाट पाहणारे प्रवासी... वेळापत्रकाचा उडालेला बोजवारा... अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या बस... अन् प्रवाशांकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्यात मश्गूल असलेले अधिकारी व कर्मचारी... असे चित्र कात्रजमधील पीएमपी स्थानकात पाहावयास मिळाले.


निम्म्याहून अधिक क्षेत्र बांधकामांनी बाधित
वारजे माळवाडी - वारजे माळवाडीच्या हद्दीतही बीडीपी आरक्षणाचे मोठे क्षेत्र आहे. खासगी व वन विभागाच्या हद्दीत तीन ठिकाणी वेगवेगळे क्षेत्र आहे. त्यापैकी ७० ते ७५ टक्के जागेवर बांधकामे झाली आहेत. आरक्षणाच्या जागा ताब्यात घेऊन ते विकसित करण्याची महापालिकेची क्षमता आहे का?, त्या दृष्टीने महापालिकेने काय नियोजन केले आहे?, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
पुण्याचे सव्वा वर्षाचे पाणी सोडले
खडकवासला - खडकवासला प्रकल्पातून आजअखेर सुमारे 19 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून सोडलेला हा पाणीसाठा शहराला सव्वा वर्ष पुरेल इतका आहे.
कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
येरवडा : कारागृह प्रशासन सर्जनशीलतेने राबवित असलेल्या कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याची परिणामकारकता चांगली असून, पोलिसांना गुन्हेगारांच्या नियंत्रणाचे काम कमी होईल, अशी आशा पुणे शहराचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी व्यक्त केली.


#वर्तमान: “स्मार्ट’ पुणेकरांची सत्त्वपरीक्षा सुरूच
पुणे शहरातील गेल्या दोन दिवसांतील वाहतुकीचे चित्र लक्षात घेता पुणेकर नागरिकांची सत्त्वपरीक्षा सुरू झाली असे म्हणावे लागेल. पुण्याची वाहतूक समस्या आणि कोणत्याही वेळी कोणत्याही रस्त्यावर होणारे ट्रॅफिक जाम हा आता कौतुकाचा नव्हे, तर मोठ्या त्रासाचा विषय झाला आहे, हेच खरे.


Thursday, August 23, 2018
Civic body’s nod to new IT parks to boost industry
Information technology parks spread over 1 crore sqft would ..

रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या सूचना विचारात घ्या
उच्च न्यायालयाचे आदेश ; ‘तक्रार निवारण यंत्रणा’ स्थापन करावी
पुणे : महापालिकांनी यांच्या अखत्यारीतील सर्व रस्ते सुस्थितीत ठेवावेत. खड्डे शास्त्रोक्तपद्धतीने बुजवावेत. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांकडून प्राप्त होणार्या तक्रारी स्वीकारण्यासाठी व त्यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी ‘तक्रार निवारण यंत्रणा’ सर्व महापालिकांनी कार्यन्वित करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
मंडईमधील ड्रेनेजचे काम कधी पुर्ण होणार?
विक्रेत्यांचा सवाल : पावसाच्या पाण्यामुळे तारांबळ
पिंपरी – महापालिकेच्या पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री मंडईतील दुसऱ्या बाजूचे ड्रेनेजचे काम रखडल्याने पावसाचे पाणी तुंबून विक्रेत्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. ड्रेनेजचे काम कधी पुर्ण होणार, असा सवाल विक्रेते करत आहेत.

Ten-storey parking near East Street by 2019
The Pune Cantonment Board (PCB) will construct a 10-storey facility in 14 months to park 180 cars on Lloyd Road at the junction of East Street and Coyaji Road.

तासाभरात 30 दुचाकींना जॅमर
पुणे - शिवाजीनगरमधील सिमला ऑफिस चौकात वाहतूक पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या 30 चालकांच्या दुचाकींना जॅमर लावून कारवाई केली. तासाभरात झालेल्या कारवाईत 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, शहराच्या विविध भागांत 66 ठिकाणी "नो ट्रॅफिक रूल व्हायलेशन झोन' तयार करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.


१२१ व्यक्तींमागे एक स्वच्छतागृह
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता असल्याची स्पष्ट कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यता आली आहे.
‘ई-टॉयलेट’च्या प्रस्तावाला मंजुरी
पुणे कँटोन्मेंट बोर्डातर्फे लष्कर परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी वर्दळीच्या ठिकाणी ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. ईस्ट स्ट्रीटवरील राणी लक्ष्मीबाई उद्यान, महात्मा गांधी रस्ता व डॉ. कोयाजी रस्ता, जे. जे. गार्डन, महात्मा गांधी बसस्थानक आणि एम्प्रेस गार्डन परिसरात ही स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावाला बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
ट्रेन कुठे आहे? आता मिळणार लाईव्ह स्टेट्स व्हॉट्सअॅपवर
ट्रेनची माहिती मिळविण्यासाठी आता १३९किंवा अन्य कोणत्याही अॅपवर जाण्याची यापुढे गरजच उरलेली नाही. कारण आता ट्रेनचा लाईव्ह स्टेटस, पीएनआरची माहिती आपल्या जिवाभावाच्या व्हॉट्सअॅपवर सहज मिळणार आहे. यासाठी रेल्वेने MakeMyTrip या वेबसाईटसोबत सामंजस्य करार केला आहे.
पुणे : सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास येऊ शकता अडचणीत
पुणे शहरातील वाहतुक सुरळीत चालावी आणि येणाऱ्या सण उत्सवामध्ये वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतुक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत ज्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांची माहिती पासपोर्ट, चारित्र पडताळणी तसेच इतर शासकिय कार्यालयांना देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर शासकीय कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.
Follow every traffic rule: Pune police to set up over 60 ‘no violation’ zones across city
In a few days, PUNE City Police’s traffic branch is planning to set up over 60 ‘no traffic rule violation zones’ across the city, where commuters will be fined for practically every traffic violation. Information on the violators will also be shared with the Regional Transport Office and Regional Passport Office, said police. Earlier, the traffic branch has conducted drives for rule violations under particular heads, such as driving under influence, tinted glass on cars, commuters without helmets and seat belts, and parking in no-parking zones. Under the next drive, commuters who violate any of these rules will be fined.


‘रेरा’तील प्रकल्प वैधतेमुळे ‘बिल्डर’ वठणीवर
रेरा कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक नोंदणीकृत प्रकल्पाची माहिती महारेरा पोर्टलवर अगदी सहज उपलब्ध झाली आहे. बांधकाम प्रकल्प वैधतेची माहिती ग्राहकांना अगदी सहजरित्या उपलब्ध होत असल्याने मनमानी करणारे बिल्डर वठणीवर आले आहेत.


पेठांमध्ये भुयारी मेट्रो मार्गाशिवाय पर्याय नाही
शहरातील पेठांमधून मेट्रोचा मार्ग भुयारी असणार आहे. या मार्गामुळे या भागातील अनेक घरे बाधीत होत आहेत. त्यामुळे याठिकाणी उन्नत मेट्रो करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र पेठांमधील रस्ते अरुंद असल्यामुळे ते शक्य नाही. याशिवाय उन्नत आणि भुयारी मेट्रोविषयी नागरिकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचे आढळून येत आहे. हे गैरसमज दूर करून शहरातून भुयारी मेट्रो मार्ग कसा करण्यात येणार आहे याविषयी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी नागरिकांसाठी आयोजित संवादात माहिती दिली.


सर्व्हिस टॅक्स भरायला महापालिका विसरली
महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. 2007 ते 2012 या पाच वर्षांचा सर्व्हिस टॅक्स भरायचा महापालिकेला विसर पडला असून, केंद्रिय जीएसटी भवनने फटकारल्यानंतर आता प्रशासनाला जाग आहे. त्यामुळे आता दंडासहित तब्बल 7 कोटी 61 लाख रुपयांचा सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार असून, त्यासंबधीचा प्रस्ताव प्रशासनाने आयुक्तांसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
अनधिकृत फ्लेक्सबाजीला उधाण
वारजे उपनगरातील वारजे, कर्वेनगर मुख्य चौक, तसेच आंबेडकर चौक, वारजे हायवे चौक, माळवाडी बसस्टॉप, गणपती माथा, तसेच शिवणे या मुख्य चौक परिसरात अनधिकृत फ्लेक्सला उधाण आले असून या अनधिकृत बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसर विद्रुप झाल्याचे दिसून येत आहे. परिसर विद्रुपीकरणासह पालिकेची परवानगी न घेता जाहिरातबाजी करणार्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक करत आहेत. महापालिका हद्दीत फ्लेक्स लावण्यासाठी आकाश चिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असतानाही कुठलीही परवानगी न घेता अनेकदा असे जाहिरात फ्लेक्स लावले जात आहेत.
‘एलईडी’ प्रक्रियेवर गंभीर ताशेरे
खुलासा घेण्याची मुख्य लेखापरीक्षकांची आयुक्तांना विनंती
'एलईडी'च्या निविदा प्रक्रियेवर पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी गंभीर त्रुटी काढल्या असून, त्यांचा खुलासा विद्युत विभागाकडून घेण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे. ही निविदा प्रक्रिया एका ठेकेदारासाठीच राबविण्यात आली होती की काय, अशी शंका अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
कॉलेज, विद्यापीठांत अजूनही ‘जंक फूड’
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये 'जंक फूड' देऊ नये, या विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतलेल्या निर्णयाला कॉलेज आणि विद्यापीठांनी केराची टोपली दाखविल्याने 'यूजीसी'ने पुन्हा विद्यापीठांना स्मरणपत्र पाठवले आहे. तसेच या संदर्भात काय कार्यवाही केली, त्याची माहिती विद्यापीठाने द्यावी, अशा सूचना 'यूजीसी'ने केल्या आहेत.
#BDPIssue बीडीपी नागरिकांचे प्रश्न अनुत्तरित
पुणे - बीडीपी आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्याच्या बदल्यात जागामालकांना आठ टक्के टीडीआर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मोबदला किती मिळणार, त्यासाठी काय करावे लागणार, टीडीआर घेऊन करायचे काय, असे अनेक प्रश्न बीडीपी जागामालकांच्या मनामध्ये उभे राहिले आहेत.
बंद मंडयांतील गाळेवाटप सुरू
पुणे - शहरात विविध ठिकाणी उभारलेल्या मंडयांतील गाळ्यांच्या वितरणाची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. वडगाव शेरी भागातील पुण्यनगरी ओटा मार्केटमधील गाळ्यांचे पथारी व्यावसायिकांना वितरण करण्यात आले असून, सिंहगड रस्त्यावरील सनसिटी भागातील गाळेवाटप प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत.
58-year-old gets the country's first un-cemented TKR
Joshi, a Kothrud resident, found her quality of life to be heavily compromised and she depended on painkillers and other medicines and exercises ...
पीएमपीएलला 11 वर्षांत दीड हजार कोटी
पुणे - पीएमपीएल कंपनी स्थापन झाल्यापासून अकरा वर्षांत पुणे महापालिकेने कंपनीला सुमारे दीड हजार कोटी रुपये मदत केली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार तूट भरून काढण्यासाठी हे पैसे द्यावे लागत आहेत. दर वर्षी या रकमेत वाढ होत असल्याचे प्रशासनाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट होत आहे.


PMPML sets deadline but lacks funds for e-buses
PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML ..
गृहिणी ते मसाला निर्यातदार
पुणे - स्वत:च्या पायावर उभे राहण्याची महत्त्वाकांक्षा होती. तिला ‘लाइट हाउस’मुळे आत्मविश्वासाची जोड मिळाली... आज मसाले उत्पादन करीत आहे, त्याची परदेशातूनही मागणी वाढत आहे....चार जणींना रोजगार मिळाला... चिंचवड येथील वंदना पगार बोलत होत्या.... येरवडा येथील सुदर्शन चखाले या युवकालाही ‘लाइट हाऊस’ मुळे दिशा मिळाली... काय करिअर निवडावे, हे कळत नव्हते. वस्तीत राहत असल्याने मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते... आज मला रोजगार मिळालाय...आता एमएसडब्ल्यू करायचे, असे सुदर्शन आत्मविश्वासाने सांगतोय.
Wednesday, August 22, 2018
विद्यापीठाला मिळणार ‘ग्रीन’?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुढील 35 वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून, विद्यापीठाला ग्रीन विद्यापीठ अशी नवी ओळख या प्लॅननुसार मिळणार आहे. विद्यापीठ पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने विद्यापीठात सायकल, पादचारी मार्ग आणि इलेक्ट्रिक वाहतुकीला म्हणजेच ‘ग्रीन’ ट्रान्सपोर्टला चालना देण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठात शैक्षणिक, प्रशासकीय निवासी सुविधा केंद्र, अशा विभागात झोनिंग करण्यात येणार आहे.


पुण्याला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा
केंद्र सरकारच्या मॉडेल अॅक्ट कायद्यातील तरतुदीनुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह मुंबई, नागपूर आणि नाशिक या राज्यातील चार बाजार समित्यांना आता राष्ट्रीय बाजार समितीची दर्जा देण्यास राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे राज्यातील या चार प्रमुख बाजार समित्यांच्या विकासकामांना गती येण्याची शक्यता असून राजकीय हस्तक्षेपाला आता संधी मिळणार नाही. दरम्यान, यासंदर्भात अधिसूचना न काढता थेट विधिमंडळात त्यावर चर्चा करून कायद्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सायकल ट्रॅकचा प्रस्ताव केंद्राकडे
पुणे - सायकल ट्रॅक आराखड्यांतर्गत शहराच्या विविध भागांत 824 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे नुकताच सादर केला आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्ते, बीआरटीचे थांबे आणि मेट्रोची नियोजित स्थानके यांना सायकल ट्रॅकने जोडले जाणार आहे. त्यात तीन प्रकारचे सायकल ट्रॅक निर्माण होणार आहेत.


व्हॉट्सअॅपवर तीनशे तक्रारी
पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकराल्यानंतर तक्रारी करण्यासाठी पोलिसांचा अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केल्यानंतर तक्रारीचा पाऊस पडला आहे. गेल्या बारा दिवसांमध्ये नागरिकांनी या व्हॉट्सअॅप क्रमांकावर सुमारे तीनशे तक्रारी केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या वाहतुकीच्या आणि वैयक्तिक स्वरूपाच्या असल्याचे दिसून आले आहे. या सर्व तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
माननीयांच्या मेट्रोप्रेमाला ब्रेक
निगडी, कात्रज, वाघोली, हडपसर, शिवण्यात २०२२नंतर मेट्रो
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपापल्या भागात मेट्रो आणण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या कारभाऱ्यांच्या उत्साहाला 'महामेट्रो'ने ब्रेक लावला आहे. शहराच्या सर्वच भागांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याची आश्वासने सत्ताधाऱ्यांकडून दिली जात असली, तरी या सर्व मार्गांच्या कामाची सुरुवात २०२२ नंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'महामेट्रो'नेच पालिकेतील एका सभासदाला पाठविलेल्या पत्रात हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शहरातील उपनगरांमध्ये मेट्रो होणार असल्याचे स्वप्न पालिकेतील लोकप्रतिनिधींनी नागरिकांना दाखवित स्थायी समितीत प्रस्ताव मान्य करून घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात शहरातील दोन मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे स्वारगेट ते खडकवासला या मेट्रो मार्गाच्या कामाचा विचार पुढच्या टप्यात केला जाईल, असे 'महामेट्रो'ने स्पष्ट केले आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपापल्या भागात मेट्रो आणण्याची स्वप्ने दाखविणाऱ्या कारभाऱ्यांच्या उत्साहाला 'महामेट्रो'ने ब्रेक लावला आहे. शहराच्या सर्वच भागांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याची आश्वासने सत्ताधाऱ्यांकडून दिली जात असली, तरी या सर्व मार्गांच्या कामाची सुरुवात २०२२ नंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'महामेट्रो'नेच पालिकेतील एका सभासदाला पाठविलेल्या पत्रात हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शहरातील उपनगरांमध्ये मेट्रो होणार असल्याचे स्वप्न पालिकेतील लोकप्रतिनिधींनी नागरिकांना दाखवित स्थायी समितीत प्रस्ताव मान्य करून घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात शहरातील दोन मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे स्वारगेट ते खडकवासला या मेट्रो मार्गाच्या कामाचा विचार पुढच्या टप्यात केला जाईल, असे 'महामेट्रो'ने स्पष्ट केले आहे.
मेट्रोचे सर्वेक्षण रखडले
नागरिकांच्या विरोधामुळे सर्वेक्षण अपूर्ण; बुधवार पेठ स्टेशनच्या भूसंपादनासाठी 'महामेट्रो'समोर अडचणी
पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गावरील प्रस्तावित बुधवार पेठ (फडके हौद) स्टेशनसाठीच्या भूसंपादनास जागा मालकांकडून विरोध होत असल्याने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) या ठिकाणचे सर्वेक्षण अद्याप अपूर्ण आहे. नेमक्या कोणत्या जागा जाणार, त्याचा मोबदला कसा मिळणार, पुनर्वसन कुठे केले जाणार, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय सर्वेक्षण करू दिले जाणार नाही, असा पवित्रा येथील जागामालकांनी मंगळवारी घेतला.
पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गावरील प्रस्तावित बुधवार पेठ (फडके हौद) स्टेशनसाठीच्या भूसंपादनास जागा मालकांकडून विरोध होत असल्याने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे (महामेट्रो) या ठिकाणचे सर्वेक्षण अद्याप अपूर्ण आहे. नेमक्या कोणत्या जागा जाणार, त्याचा मोबदला कसा मिळणार, पुनर्वसन कुठे केले जाणार, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय सर्वेक्षण करू दिले जाणार नाही, असा पवित्रा येथील जागामालकांनी मंगळवारी घेतला.
पुरातन वास्तुदर्शन महागले
केंद्रीय पुरातत्त्व विभागाने देशभरातील संरक्षित वास्तू आणि प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश शुल्कात वाढ केली आहे.
#RentIssues भाडेकरूंना नोंदणी वाऱ्यावर
पुणे - सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाडेकरूंची नोंदणी पोलिसांकडे करणे अनिवार्य आहे. मात्र ऑनलाइन नोंदणीसाठी पोलिसांनी सुरू केलेली "टेनंट' ही सुविधा महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दुसरीकडे ऑफलाइन नोंदणी करावी, अशी मागणी करणाऱ्या नागरिकांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे.


दिवसभरात 140 बसगाड्या बंद पडल्या
पुणे - सततचा पाऊस, खड्डे आणि वाहतूक कोंडी, यामुळे पीएमपीच्या बसवर विपरीत परिणाम होऊन मंगळवारी रात्री नऊवाजेपर्यंत तब्बल 140 बस बंद पडल्या.


कोथरूड, एरंडवण्यात अभूतपूर्व कोंडी
पौड रस्ता - पौड रस्ता, कर्वे रस्ता, एसएनडीटी कॅनॉल रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणा दवाखाना, सेंट्रल मॉल, गुळवणी महाराज पथ या मुख्य व उपरस्त्यांवर मंगळवारी सकाळपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. वाहनांना मार्ग काढून देताना पोलिसांची तारांबळ उडत होती. या कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याच्या चार घटना पौड रस्ता व कर्वे रस्ता परिसरात घडल्या.


Land acquisition for BDPs to get tough, say activists
Pune: The process of land acquisition in BDP zones is set to get challenging as the low TDR rate, as sanctioned by the government, will drive land ...
Traffic cops come down hard on errant drivers
... focusing on parking breach, drink drive cases and minor's riding sans licences, was conducted at Koregaon Park, Ahmednagar Road, Viman Nagar.
राजीव गांधी बस डेपोत प्रवाशांचे हाल
बिबवेवाडीतील राजीव गांधी बस डेपोमध्ये पावसाच्या पाण्यामुळे परिसर चिखलमय, खुड्यांमुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. डेपो प्रशासनाकडे प्रवशांनी तक्रार करूनसुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नीलेश कुलकर्णी यांनी सांगितले.
टाक्यांना सत्ताधार्यांचीच आडकाठी
समान पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाक्यांच्या कामांना सत्ताधार्यांकडूनच ग्रहण लागले आहे. अनेक ठिकाणी या पक्षाच्या नगरसेवकांनी टाक्यांच्या कामाला खो घातला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.
मेट्रोसह वाघोली बस डेपोचा प्रश्न मार्गी
महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणार्या, पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसह, वाघोली बस डेपो, पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पास गती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
शहरात दीड लाख अधिकृत नळजोड
शहरातील मिळकतींची संख्या आठ लाखांपेक्षा अधिक असताना अधिकृत नळ कनेक्शन मात्र, १ लाख ६० हजार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. पालिकेकडे इतक्या कमी प्रमाणात अधिकृत नळजोड असतील तर, उर्वरित जोड बेकायदा घेतले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पोटभाडेकरू ठेवणाऱ्यांवर कारवाई
महापालिकेचा पथारी परवाना घेऊन हा परवाना भाडेकराराने देणाऱ्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येणार आहे; तसेच ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असे प्रकार उघडकीस येतील तेथे संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे नियोजन अतिक्रमण विभागाने केले आहे. या आठवड्यापासून ही कार्यवाही सुरू केली जाणार आहे. पालिकेने दिलेल्या एकूण परवान्यांपैकी ६० टक्के परवाने भाडेकराराने दिल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सीमेवरील सैनिकांकरिता पुणेकरांतर्फे २५ हजार राख्या रवाना
सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी राख्या सीमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.
शहरबात : अंदाजपत्रक आणि धोरणे कागदावरच
काही नव्या योजनांचा समावेश त्यात करण्यात येतो. काही धोरणेही तयार केली जातात.
मेट्रो कॉरिडॉरमध्येही बीडीपीचा टीडीआर
पुणे - जैववैविध्य उद्यान आरक्षणाच्या (बीडीपी) मोबदल्यात मिळणारा हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) मेट्रो मार्गाच्या ५०० मीटर कॉरिडॉरमध्येही वापरता येणार आहे.
जीएसटी मायग्रेशन प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्ष
पुणे - जीएसटी भरताना स्थलांतर (मायग्रेशन) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ज्या करदात्यांनी कायमस्वरूपी पत्ता दिला नाही. तात्पुरता पत्ता देत अस्थायी ओळख कागदपत्रे जमा केली आहे; परंतु मायग्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्यासाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या वतीने प्रत्येक जीएसटी कार्यालयामध्ये स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केल्याची माहिती केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाने कळविली आहे. जीएसटी भवन, पहिला मजला, अधीक्षक (जीएसटी एकक), ई विंग, ४१ ए, ससून रस्ता, पुणे स्टेशन या ठिकाणी हे मदत कक्ष उभारण्यात आले आहे. si-pune2gst@gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
Subscribe to:
Comments (Atom)