पुणे - महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त करून गेल्यावर्षी नवा शिक्षण विभाग सुरू करण्यात आला, तरीही शाळांचा कारभार सुधारण्याचे अजिबात नाव घेत नाही. या शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या योजनेवर पहिल्याच वर्षी ‘लाल फुली’ मारण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच योजनेची अंमलबजावणी अपेक्षित असताना, अशी काही योजना आहे का? असा उलट प्रश्न शिक्षण विभागाचे अधिकारी विचारत आहेत. त्यामुळे योजनेचा ‘श्रीगणेशा’ फसला आहे.
No comments:
Post a Comment