पुणे : पुनर्रचना आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्ते अरूंद करण्याचे महापालिकेने स्वीकारलेले धोरण वाहनचालकांच्या मुळावर आले आहे. शहरातील रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया ठप्प झालेली असताना असलेल्या रस्त्यांवरील वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र रस्ते वाहतुकीसाठी प्रशस्त कसे होतील, हे पाहण्यापेक्षा मुळातच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद करण्याचा उद्योग महापालिकेने सुरू केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या धोरणामुळे पुणेकरांना भविष्यात तीव्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment