पुण्याला स्मार्ट सिटी म्हणून ओळख करून देताना पर्यावरणाचा र्हास होऊ नये म्हणून उपयायोजना करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेला पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल हा केवळ ‘माहिती अहवाल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील पयार्र्वरणाला धोका नसल्याचे अप्रत्यक्ष गोडवे गाणार्या महापालिकेच्या या अहवालाची पोलखोल आजपासून...पुणे : शहराचे पर्यावरणीय आरोग्य ढासळले असल्याची वस्तुस्थिती असताना याला बगल देऊन केवळ गोडवे गाण्याचा प्रयत्न यंदाच्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालात झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी घातक प्रदूषकांमुळे श्वास घेणेही धोक्याचे असल्याचा इशारा केवळ एका ओळीत आटोपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही या अहवालात केला आहे.


No comments:
Post a Comment