कारागृहाच्या आत नुकत्याच घडलेल्या हाणामारीच्या आणि इतर गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने राज्यातील सेेंट्रल (मध्यवर्ती) जेल परिसरावर आता ड्रोन कॅमेर्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. कैदी आणि कारागृहाच्या आतील हालचालींवर या माध्यमातून कारागृह विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. येरवडा कारागृहात नुकतीच ड्रोन क ॅमेर्याची यशस्वी चाचणी झाली असून, काही दिवसांत राज्यातील येरवडा, कोल्हापूर, औरंगाबादसह दहा मध्यवर्ती कारागृहांत ड्रोन कॅमेर्यांची यंत्रणा कार्यरत होईल, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.
No comments:
Post a Comment