मुंबईसह पुण्यात उभारल्या जाणाऱ्या उंच इमारतींमधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत, तोवर दोन्ही शहरांमध्ये उंच इमारतींना परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी केली. आपत्कालीन स्थितीमध्ये तीस मजल्यांवर राहणाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीची यंत्रसामग्री अग्निशामक दलाकडे उपलब्ध नसल्याने तोपर्यंत गगनचुंबी इमारतींच्या बांधकामांवर निर्बंध घातले जावेत, असा आग्रह त्यांनी धरला.
No comments:
Post a Comment