महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसह स्मार्ट सिटी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेत स्मार्ट सिटी कंपनीच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यालय तसेच सिंहगड रस्ता येथील 'कमांड अँड कंट्रोल' सेंटर महापालिकेच्या इमारतीत कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या या बैठकीत स्मार्ट सिटी कंपनीशी निगडित महत्त्वाच्या सहा प्रश्नांबाबत चर्चा झाली असल्याने गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली स्मार्ट सिटीची परवड संपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment