Monday, July 30, 2018

खडकवासला धरणाजवळील चौपाटी दर रविवारी बंद राहणार

सिंहगड रस्त्यावरील खडकवासला धरणपरिसरात फिरण्यासाठी आणि चौपाटीचा आनंद घेण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या चौपाटीजवळचा मुख्य रस्ता अरुंद असल्याने येथे वाहनांची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे येथे पर्यटकांसह सिंहगड रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला समोरे जावे लागते. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे ग्रामीणच्या हवेली पोलिसांनी दर रविवारी ही चौपाटी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशी चौपाटीचा आनंद लुटता येणार नसल्याने पोलिसांच्या या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment