पुणे : बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक यंत्रणा बंधनकारक केल्याच्या आदेशाची अद्याप कार्यवाही झालेली नाही. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र, मुदत उलटून गेल्यानंतरही किती महाविद्यालयांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली याचा तपशील शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बायोमेट्रिक यंत्रणेकडे बहुतांश महाविद्यालयांनी दुर्लक्षच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment