शहरातील विकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या सभासदांच्या प्रस्तावावर अभिप्राय न देण्याचे धोरणच पालिकेतील अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. गेल्या चार महिन्यांत सभासदांनी पाठविलेल्या २३ प्रस्तावांपैकी अवघ्या दोन प्रस्तावांवर पालिका प्रशासनाने अभिप्राय दिला आहे. अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे शहर सुधारणा समितीचे सभासद त्रस्त झाले असून समितीच्या बैठकीत यावर नाराजी व्यक्त करत काही सभासदांनी कडक शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
No comments:
Post a Comment