पुणे - बुधवार पेठेतील इलेक्ट्रिकल वस्तूंच्या जे. के. मार्केट इमारतीच्या छतावर सोमवारी सकाळी मोर सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. साडेचार फुटांच्या या मोराला दक्ष नागरिकांनी पक्षीमित्रांच्या मदतीने पकडून कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दिला. एरवी वनविभागात दृष्टीस पडणारा मोर भरवस्तीत आला कोठून, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
No comments:
Post a Comment