Wednesday, July 25, 2018

वाघोली येथे टर्मिनल उभारण्याची मागणी

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वाघोली येथे बस टर्मिनल बांधून देण्याची मागणी केली आहे. जागेचा मोबदला देऊन टर्मिनल विकसित करणे पीएमपीला आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे, त्यामुळे 'पीएमआरडीए'ने साह्य करावे, असे पीएमपीने पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment