पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळातर्फे पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्नगटासाठी ३ हजार १३९ सदनिका व २९ भूखंडांच्या विक्रीसाठी येत्या ३० जून रोजी सोडत काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) संकेतस्थळावर येत्या गुरुवारी (दि.१७) या सोडतीची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे, असे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सोडतीसाठी आॅनलाइन अर्ज १९ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत करता येईल. स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २४ जून रोजी प्रसिद्ध करून हरकतींचा विचार करून अंतिम यादी २६ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल.
No comments:
Post a Comment