Sunday, July 22, 2018

टेमघर धरण यंदा लवकर रिकामे करणार

डिसेंबरपासून पुन्हा दुरुस्ती : शहराच्या पुरवठ्यावर परिणाम नाही

पुणे – टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला यश आल्यानंतर धरणातील गळती काही प्रमाणात कमी झाली आहे. टेमघर धरण गळतीपासून मुक्त करण्याचा निर्धार जलसंपदा विभागाने केला आहे. त्यानुसार येत्या डिसेंबरपासून धरणाच्या आतील बाजूच्या भिंतीस सिमेंटचे अस्तरीकरण केले जाणार आहे. शहराला पिण्यासाठी आधी टेमघर धरणातील पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी टेमघर धरण यंदा लवकर रिकामे करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

No comments:

Post a Comment