पुणे - शहरातील जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी पुणेकर स्वत:च्या वाहनाला पसंती देत आहेत. त्यामुळे प्रत्येक पुणेकराकडे किमान एक वाहन असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. शहराची लोकसंख्या ३४ लाख, तर वाहनांची संख्या ३६ लाख अशी परिस्थिती आहे. कोलमडलेले वाहतूक नियोजन, वाहतूक कोंडी आणि इंधनाचे दर वाढूनही पुणेकरांनी गेल्या वर्षात वाहन खरेदी करताना ‘टॉप गिअर’ टाकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट आहे.


No comments:
Post a Comment