महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या येवलेवाडीचा विकास आराखड्यातील (डीपी) काही जागा निवासी करण्याबरोबरच काही नाल्यांचे मार्ग बदलण्याचा प्रताप करण्यात आला आहे. 'डीपी'वर नागरिकांकडून घेण्यात आलेल्या हरकती, सूचनांवर निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने या शिफारशी केल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या या शिफारशींवर महापालिकेच्या आज (गुरुवारी) २६ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन निर्णय होणार आहे.
No comments:
Post a Comment