पुणे : पुणे-बंगलुरु महामार्गावरुन कात्रजहून निगडीला जाणारी पीएमपीएल बस सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वारजे येथे पुलावरुन खाली पडली. या घटनेत बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज-निगडी ही बस महामार्गावरुन निगडीला निघाली होती. सकाळी अकरा वाजता बस वारजे गावाजवळ पोहोचली. त्यावेळी अचानक बस डाव्या बाजूने पुलावरील रस्त्याच्या खालील बाजूस जाऊन पडली. प्रवाशांनी आगोदरच खचाखच भरलेली बस पडल्याने अनेक प्रवाशांना जबर मार लागला. काही प्रवाशांना जवळील माई मंगेशकर रुग्णालय तर काही प्रवाशांना शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले.


No comments:
Post a Comment