येवलेवाडी गावच्या विकास आराखड्यातील (डीपी) सुमारे डोंगरमाथा डोंगर उताराचे आरक्षण असलेले १५ हेक्टर क्षेत्र निवासी करण्याचा घाट घालण्यात आल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. सुमारे १०० कोटी रुपये किमतीच्या जमिनीवरील आरक्षणात बदल करण्याची शिफारस विकास आराखड्यावरील हरकती सूचनांवर निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या नियोजन समितीने केली आहे. त्याचबरोबर दफनभूमीचे क्षेत्र निवासी करणे, वॉटर स्पोटर्सचे आरक्षण बदलणे, रस्त्याच्या अलाइनमेंट बदलण्यासारखे सहा ते सात आरक्षणाचे बदल केले असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
No comments:
Post a Comment