पुणे - आई-वडिलांना उत्तम स्वास्थ्य लाभावे, या उद्देशानेच वारीमध्ये दोन पावले चालायला हवेच. तसेच त्यांच्या विषयीची कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्स केबल्स’ने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा उत्स्फूर्तपणे बोलून दाखविली. एवढेच काय ! तर ‘साथ चल’ उपक्रमात सहभागी होण्याची शपथही घेतली.


No comments:
Post a Comment