पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. शहरात आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली, तर पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर शुक्रवारपर्यंत 129 इतक्या खड्ड्यांच्या तक्रारींची नोंद झाली. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गुरुवारी झालेल्या मुख्यसभेतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर आता प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी वेगाने कामे सुरू केली असल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. ते म्हणाले, 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे असलेल्या रस्ते दुरुस्ती व्हॅनमार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे, आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविले गेले आहेत. त्यावर जवळपास 30 लाखांचा खर्च झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमाकांवर गेल्या तीन दिवसांत 129 तक्रारींची नोंद झाली असून, त्यात शुक्रवारी आलेल्या 22 तक्रारींचा समावेश आहे.


No comments:
Post a Comment