Friday, July 20, 2018

खासगी वाहतुकीचा प्रस्ताव टाळण्यासाठी पीएमपी भलत्याच ‘मार्गा’वर

सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रमुख तीन मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू करण्याचा फोर्स मोटर्स या कंपनीने दिलेला प्रस्ताव टाळण्यासाठी पीएमपी भलत्याच ‘मार्गा’वर गेली आहे. हिंजवडी ते विमानतळ (मार्गे पुणे रेल्वे स्थानक) आणि पुणे दर्शन या मार्गावर फोर्स मोटर्सने सेवा सुरू करावी, असा अभिप्राय पीएमपीकडून देण्यात आला आहे. पीएमपीच्या या अभिप्रायामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासंदर्भात पीएमपी प्रशासन किती असंवेदनशील आहे, हेही स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment