Sunday, July 1, 2018

वारीसाठी पीएमपीकडून जादा बसेस

पुणे – संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीने आळंदी आणि देहू येथे जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे दि. 3 ते 7 जुलैदरम्यान स्वारगेट, मनपा स्थानक, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड आदी ठिकाणाहून दरदिवशी 110 बसेस आळंदी, देहूसाठी सोडण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment