पुणे - कागदनिर्मिती रद्दीपासून ३५ टक्के, भाताचा तूस, गव्हाचा तण आणि बगॅस पासून ४२ टक्के होते. केवळ २३ टक्के निर्मिती झाडापासून मिळणाऱ्या लगद्यापासून होते. झाडे तोडली तरीही त्यापेक्षाही कितीतरी पटीने कंपन्यांमार्फत हजारो एकर जागेत शेतकऱ्यांच्या सहकार्यातून कागद निर्मिती होत असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणाऱ्या कागद व्यवसायासंबंधीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनने केले आहे.


No comments:
Post a Comment