पुणे – पावसाच्या उघडीपीमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात फळभाज्यांची मोठी आवक झाली आहे. त्या तुलनेत भाज्यांना उठाव आहे. त्यामुळे आले, टोमॅटो, पावटा आणि कांदा वगळता सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. बेंगलोर आल्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आल्याच्या तर, मागणी कमी असल्यामुळे टोमॅटो आणि पावटाच्या भावात घसरण झाली आहे. एकमेव कांद्याच्या भावात मात्र वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात सुमारे 160 ते 170 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. त्यामध्ये हिमाचल प्रदेशमधून 4 टेम्पो मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून 5 ते 6 ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, मध्यप्रदेश, इंदौर येथून 6 ते 7 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, बेंगलोर आले 2 टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून मिळून लसणाची साडे 4 ते 5 हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 2 हजार पोती, टॉमेटो पाच ते साडे पाच हजार पेटी, फ्लॉवर 14 ते 15 टेम्पो, कोबी 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, भेंडी 8 ते 10 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, भुईमूग शेंगाची 250 पोती, कांद्याची 100 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 30 ते 35 ट्रक इतकी आवक झाली.

No comments:
Post a Comment